Atiq Ahmed Son Asad Encounter: उमेश पाल हत्याकांड प्रकरणी (Umesh Pal Murder Case) फरार असणारा आरोपी असद अहमद (Asad Ahmed) गुरुवारी पोलीस चकमकीत ठार झाला. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने (Uttar Pradesh Special Task Force) ही कारवाई केली. असद अहमद याच्यासह त्याचा शूटर गुलाम (Gulam) यालाही पोलिसांनी ठार केलं आहे. दरम्यान उमेश पाल हत्याकांड प्रकरणी आजच अतीक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) यांना प्रयागराजमध्ये कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्याला मुलगा असद अहमदच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा तो जोरजोरात रडू लागला. दुसरीकडे अशरफ याला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युपी एसटीएफने गुरुवारी झाशी येथे गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथादीर गुलाम याला पोलीस चकमकीत ठार केलं. डीएसपी नवेंदू आणि विमल यांच्या नेतृत्वाच ही चकमकीची कारवाई करण्यात आली. पोलिसांना घटनास्थळी परदेशी बनावटीची शस्त्रं सापडली आहेत. पोलिसांनी दोघांवरही प्रत्येकी पाच लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. 


मोठी बातमी! गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलिसांकडून एन्काऊंटर


आज एकीकडे ही चकमक होत असताना दुसरीकडे उमेश पाल हत्याकांड प्रकरणी अतीक अहमद आणि अशरफ यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी अतीक अहदम याला मुलगा असद चकमकीत ठार झाला असल्याची माहिती मिळाली. हे ऐकताच अतीक अहमद कोर्टातच रडू लागला. 


2005 मध्ये बहुजन समाज पार्टीचे आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणात उमेश पाल प्रमुख साक्षीदार होते. 24 फेब्रुवारीला प्रयागराज येथे उमेश पाल आणि त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांची यांची हत्या करण्यात आली होती. उमेश पाल आपल्या घरातून जात असताना रस्त्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी बॉम्बही फेकण्यात आले होते. 


तपासात गँगस्टर अतीक अहमदने केलेल्या हट्टामुळेच असदला उमेश पाल हत्याकांडात सहभागी करुन घेतल्याचं आणि त्याच्याकडून गोळी चालवण्यात आल्याचं समोर आलं होतं. शाइस्ताने याप्रकरणी अतीककडे फोन करुन नाराजी जाहीर केली होती. उमेश पाल हत्याकांडानंतर पाचही शूटर फरार झाले होते. असद आणि गुलाम दिल्लीत जाऊन लपले होते. 


अतीकला 7 दिवसांची पोलीस कोठडी


मुलगा असद पोलीस चकमकीत ठार झालेला असताना अतीक अहमदवरील अडचणीही वाढताना दिसत आहेत. अतीक आणि अशरफ यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी कोर्टात 14 दिवसांची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने 7 दिवसांची कोठडीच मान्य केली. दरम्यान कोर्टातून बाहेर नेलं जात असताना अतीकवर बूट फेकण्यात आला. यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ पोलीस व्हॅनमध्ये बसवून नेलं.