नवी दिल्ली : गुणवत्तेच्या मुद्द्यावरून आगोदरच चर्चेत असलेली नेस्ले कंपनी 'MAGGI' (मॅगी) मुळे पुन्हा एकदा फेल झाली आहे. त्यामुळे नेस्लेला तब्बल 45 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


वितरक आणि विक्रेत्यांना 62 लाखांचा दंड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुणवत्ता तपासण्यासाठी उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत मॅगीची काही सॅंम्पल जप्त केली होती. या सॅम्पलची कायदेशीर नियमानुसार तपासणी केली असता ती दोषी आढळली. त्यामुळे प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईत नेस्ले कंपनीला 45 लाख रूपयांचा दंड ठोठावला. तर, कंपनीसोबतच मॅगिचे डिस्ट्रीब्यूटर आणि विक्रेत्यांना 62 लाख रूपयांचा दंड ठोठावला. याशीवाय इतर सहा विक्रेत्यांना 17 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.


 वितरक आणि विक्रेत्यांमध्ये खळबळ


 दरम्यान, या कारवाईमुळे वितरक आणि विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली होती. यात मॅगीचे बरेचसे सॅम्पल तपासणीसाठी जप्त करण्यात आले होते. प्रयोगशाळेत सॅम्पल फेल झाल्यावर सर्व साक्षी, पुराव्यांच्या अधारे अप्पर जिल्हाधिकारी जितेंद्र शर्मा यांनी कडक कारवाई करत 62 लाखांचा दंड ठोठावला.


 


आरोग्याला धोकादायक आहे मॅगी


दरम्यान, मॅगीमध्ये ठरवून दिलेले आवश्यक ते घटक सापडत नाहीत. त्यामुळे मॅगी आरोग्याला हानिकारक आहे. विशेषत: लहान मुलांना मॅगी अधिक धोकादायक असल्याची प्रतिक्रीया जिल्हाधिकारी जितेंद्र शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना दिली.