मुंबई : घटस्फोट होण्याचं प्रमाण सध्या वाढत आहे. घटस्फोटाची वाढती आकडेवारी धोक्याची घंटा आहे. कोर्टाने देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लग्न मोडत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे जिथे मॅगीमुळे पतीने पत्नीला घटस्फोट दिलाय. कारण ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरतर बायकोला मॅगी नूडल्स व्यतिरिक्त इतर काहीही कसे बनवायचे हे माहित नव्हते. त्यामुळे संसार सुरु होण्याआधीच मोडला. 2 मिनिटात तयारी होणारी मॅगी पतीला खटकली आणि त्याने थेट कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला.


'टाइम्स नाऊ' मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, एमएल रघुनाथ म्हैसूरच्या सत्र न्यायालयात घटस्फोटाच्या एका रोचक प्रकरणाची आठवण करत सांगत होते की, जेव्हा ते बल्लारीमध्ये जिल्हा न्यायाधीश होते, तेव्हा त्यांच्यापुढे एक विचित्र प्रकरण आलं होतं. एका पुरुषाला पत्नीने फक्त मॅगी बनवल्याने त्रास झाला.


पतीने तक्रार केली की आपल्या पत्नीला मॅगीशिवाय काहीही येत नव्हते. पतीने न्यायाधीशांना सांगितले की, पत्नी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या तिन्ही वेळी फक्त मॅगीच बनवायची. न्यायाधीश रघुनाथ यांनी या प्रकरणाला मॅगी केस असे नाव दिले होते. मात्र, दोघांच्या परस्पर संमतीने घटस्फोट झाला. न्यायाधीशांनी सांगितले की, काही लोकांचा कल लग्नाच्या त्याच दिवशी घटस्फोट घेण्याकडे असतो.


छोट्या छोट्या गोष्टींवर घटस्फोट!


न्यायाधीश म्हणाले की, लोक अगदी छोट्या गोष्टींवर लग्न मोडत आहेत. कोणत्याही जोडप्याने त्यांच्या लग्नाला किमान एक वर्ष दिले पाहिजे. गेल्या काही वर्षांत घटस्फोटाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.