2024चा दारुजप्तीचा नवा रेकॉर्ड! निवडणुकीच्या 36 दिवसांत तब्बल `इतके` लिटर दारू जप्त
Excise Department: 36 दिवसांत तब्बल 35 लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
Excise Department: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या दारूचे आकडे पाहिले तर तुमचे डोळे सक्रावतील.राज्य उत्पादन शुल्क विभागाने यंदा रेकॉर्डब्रेक दारू जप्त केलीय.
विधानसभा निवडणुक जिंकून सत्तेच्या सिहांसनावर बसायला उतावीळ झालेल्या राजकारण्यांनी प्रचारात 'मोफतबाजी'चा सपाटा लावलाय... मतदारांना आकर्षित करण्यासाठी या मंडळींनी आपला हात मोकळा सोडलाय..चोरी-चोरी छुपके छुपके प्रचारात दारु ओतणाऱ्यांची झिंग राज्य उत्पादन शुल्क विभागाने उतरवलीय. गेल्या 30-35 वर्षांत यंदा पहिल्याच 'एक्साइज'च्या हाती रेकॉर्ड ब्रेक दारु लागलीय.जेमतेम ३६ दिवसांत या खात्याला 39 कोटी 67 लाख रुपयांची दारु जप्त करण्यात आलीय.
36 दिवसांत तब्बल 35 लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या दारूची किंमत तब्बल 39 कोटी 67 लाख रुपये इतकी आहे. यात विदेशी दारू 1 लाख 13 हजार लिटर इतकी होती. हातभट्टीची दारू 2 लाख 20 हजार लिटर इतकी होती. गावठी दारूसाठीचा माल - 24 लाख 75 हजार लिटर,स्पिरीट - 44 हजार 300 लिटर, ताडी - 33 हजार लिटर,भांग - 3 हजार किलो, परराज्यातील दारू - 41 हजार लिटर इतकी होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईवर नजर टाकल्यानंतर आपल्याला 2024 च्या निवडणुकीत कसा दारूचा महापूर सुरू आहे याचा अंदाज आपल्याला येईल.विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 13 कोटी 37 लाख रुपयांची दारू एक्साईज विभागाने जप्त केली होतीतर नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या 75 दिवसांच्या आचारसंहितेच्या काळात तब्बल 37 कोटी 64 लाख रुपयांची दारू उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली होती. विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार एक ना अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवताना पाहायला मिळतात. त्यात दारूची झिंग काही या निवडणुकीत नवी नाहीय.. मात्र 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत जप्त केलेल्या दारुचा रेकॉर्डब्रेक आकडा पाहिला तर आपल्यालाही काही सेंकंद का होईना झिंगल्यासारखं होईल.
9 लाख 93 हजार पाचशे रुपये सापडले
मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप झाला. विरारच्या हॉटेलमध्ये विनोद तावडे बसलेले असताना बविआच्या कार्यकर्ते हॉटेलमध्ये घुसले. पैशांची पाकिटं नाचवली गेली. वाटलेले पैसे दाखवले गेले. विनोद तावडे आणि क्षीतिज ठाकूर यांच्यातही शाब्दिक बाचाबाची झाली.. यावेळी क्षीतिज ठाकूर यांनी डायरी आणि बॅग दाखवून पैसे वाटप होत असल्याच आरोप केलाय.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपची बैठक सुरू असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत बविआच्या कार्यकर्त्यांनी तिथे जोरदार गोंधळ घालायला सुरूवात केली.गोंधळ पाहून पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्याचवेळी तिथे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर त्यांच्या सर्थकासंह पोहोचले. त्यानंतर चौथ्या मजल्यावर जिथे बैठक सुरू होती तिथे ठाकूर गेले. यावेळी क्षीतिज ठाकूर आणि विनोद तावडेंमध्ये शाब्दिक चकमक झाली.बविआ आणि भाजप यांचा राडा तब्बल 3 तास चालला. दरम्यान वसईच्या तुळींज इथल्या हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे आणि भाजपचे काही कार्यकर्ते तेथे पैसे वाटप करत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाची टीम तिथे पोचली. त्या ठिकाणी एस एस टी टीमला 9 लाख 93 हजार पाचशे रुपये सापडल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.