मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde Delhi Tour) यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आला आहे. दौरा रद्द करण्याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.  मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. मात्र आता हा दौरा रद्द झालाय.  (maharashtra chief minister eknath shinde today delhi tour cancel reason is not clear)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सत्तास्थापन होऊन जवळपास 24 दिवस उलटले आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा आजचा (27 जुलै) दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात होता. 


नियोजित वेळापत्रकानुसार मुख्यमंत्री आज रात्री 9 पर्यंत दिल्लीत येणं अपेक्षित होते. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मंत्रिमंडळाबाबत चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे या राज्याच्या आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची होती. मात्र एकनाथ शिंदे मुंबईतून निघालेच नाहीत. त्यामुळे आता हा दिल्ली दौरा पुन्हा कधी पुर्ननियोजित करण्यात येतो,  याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागून राहिलं आहे.


मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय


दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं अनुदान, तसेत वीजेवर सवलत असे 2 मोठे आणि महत्त्वाचे शेतकऱ्यांबाबतचे निर्णय शिंदेंनी घेतले.