नवी दिल्ली : दिल्लीत काँग्रेसची वर्किग कमिटीची बैठक संपली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी काँग्रेसने पाठिंबा द्यायचा किंवा नाही, यावर ही बैठक होती. मात्र या बैठकीतून बाहेर आल्यानंतर या नेत्यांनी मीडियाला कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार किंवा नाही, यावर महत्वाचा निर्णय झाला असण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आमदार अजूनही जयपूरमध्येच आहेत. तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 4 वाजता दिल्लीत बैठक होणार आहे, या बैठकीत चर्चा झाल्यानंतर शिवसेना पाठिंबा द्यायचा किंवा नाही. तसेच बाहेरून शिवसेनेला पाठिंबा देता येईल का? यावर चर्चा होणार आहे. ही माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीत दिली आहे.


असं म्हणतात की, जो पर्यंत शिवसेना एनडीएतून बाहेर येणार नाही, तोपर्यंत काँग्रेस कोणत्याही निर्णयावर पोहोचणार नसल्याचं म्हटलं जात असलं, तरी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.


वरील बैठक ही सोनिया गांधी यांच्या दसजनपथ येथे झाली, पुढील बैठक देखील दिल्लीत सायंकाळी 4 वाजता होणार आहे.