shiv jayanti 2023 at New Delhi  Agra Fort : जिथे औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना कैद केले त्याच आग्रा किल्ल्यात धुमधडाक्यात शिवजयंती साजरी होणार आहे.  आग्रा किल्ल्यात शिवजयंती(shiv jayanti 2023) साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरातत्व विभागाने आग्रा किल्ल्यात (Delhi to Agra Fort) शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी दिली आहे. या शिवजयंती सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath ) उपस्थित राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवजयंतीची तयारी करणाऱ्या तमाम शिवप्रेमींचा उत्साह या निर्णयामुळे द्विगुणीत झाला आहे. आग्रा येथील लाल किल्ला मधील दिवान-ए-आम सभागृाहतच यंदा 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होणार आहे.
अखेर आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आग्रा किल्ल्याच्या दिवाण-ए-आममध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागानं परवानगी दिली आहे. 


विनोद पाटील याचं अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिल्लीच्या आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीचं आयोजन करण्यात आले आहे. आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करता यावी यासाठी 11 नोव्हेंबर 2022 पासून अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे सातत्याने प्रयत्न सुरू होते.


या आग्रा किल्ल्यावर आगाखान पुरस्काराशी संबंधित एक कार्यक्रम यापूर्वीच झाला आहे. अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी होती. असा युक्तीवाद त्यांनी केला. परंतु या किल्ल्याशी ऐतिहासिक संबंध असलेल्या महापुरुषाची जयंती साजरी करण्यास भारतीय पुरातत्व विभाग परवानगी देत ​​नव्हता. यासाठी यानंतर अजिंक्य देवगिरी फाउंडेशनच्या वतीने विनोद पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेरीस त्यांच्या लढ्याला यश आले आहे.


आग्रा किल्ल्याच्या दिवाण-ए-आमचा इतिहास


साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र युवराज संभाजी यांना मुघल सम्राट औरंगजेबाने आग्रा किल्ल्यात कैद केले होते. औरंगजेबाने त्यांना मारण्याचा कट रचला होता. मात्र, शिवाजी महाराज येथून सुखरूप निसटले होते. मराठ्यांच्या इतिहासात या घटनेला खूप महत्त्व आहे.