प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा `भारत छोडो` चळवळीचा देखावा
राजपथावर महात्मा गांधी यांच्या जीवनावर चित्ररथ साकारला जाणार आहे.
नवी दिल्ली : येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रा तर्फे 'भारत छोडो' चळवळीचा देखावा उभारण्यात येणार आहे. राजपथावर महात्मा गांधी यांच्या जीवनावर चित्ररथ साकारला जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना चित्ररथाच्या माध्यमातून राजपथावर दिसणार आहेत. महाराष्ट्र सरकारने १९४२ चा भारत छोडो चळवळीचा देखावा सादर केला आहे.
नितीन चंद्रकात देसाई यांनी हा चित्ररथ साकारला आहे. गेल्या वर्षी देखील महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ साकारण्यात आला होता. आतापर्यंत महाराष्ट्राच्या चित्ररथाला सहा वेळा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. २०१७ मध्ये लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला होता.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राच्या शिवचित्ररथाकडे सगळ्यांच लक्ष असतं. गेल्यावर्षी शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ येताच जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी राजपथाचा परिसर दुमदुमून गेला होता. अनेक उपस्थितांनी उभे राहून त्या चित्ररथाला दाद दिली होती.
पाहा बातमीचा व्हिडिओ