Eci On Shiv Sena : शिवसेनेला निवडणूक आयोगाचा धक्का
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का दिला आहे.
नवी दिल्ली : या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेला पुरावे गोळा करण्यासाठी आधी 4 आठवड्यांची मुदत दिली होती. मात्र निवडणूक आयोगाने या मुदतीत जवळपास 13 दिवसांनी कमी केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला कमी दिवसात आता कमी दिवसांमध्ये पक्षाबाबत कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. (maharashtra political crisis 15 days term instead of 4 weeks for shiv sena to collect evidence from election commission of india)
राज्यात गेल्या अनेक दिवस सत्तासंघर्ष चालला. त्यानंतर नवं सरकार स्थापन झालं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या 'धनुष्य बाण' या चिन्हावर आपला दावा ठोकला. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले.
धनुष्यबाण कोणाचं, असा पेच निर्माण झाला. वाद टोकाला पोहचला. धनुष्य बाण कोणाचं, हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला. तसेच हा विषय अजून न्यायप्रविष्ठ आहे. मात्र आता न्यायलयाने शिवसेनेला 4 आठवड्यांऐवजी 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर लवकरात लवकर कागदपत्र जमा करुन ती आयोगासमोर सादर करण्याचं आव्हान असणार आहे.