कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यात सत्तास्थापनेपासून आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराचं (Maharashtra Cabinet Expansion) भिजतं घोंगडं अजूनही कायम आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नाहीये. या पार्श्वभूमीवर महिन्याभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातत्याने दिल्लीवारी सुरु आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.  (maharashtra political crisis cm and dcm eknath shinde and devendra fadnavis will go tomorrow for 2 days delhi tour)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या आणि पर्वा (6 आणि 7 ऑगस्ट) पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. एकूण 2 दिवसांचा हा दौरा असणार आहे.


देशात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सावानिमित्ताने 'हर घर तिरंगा' हे अभियान राबवण्यात येणार आहे. 'हर घर तिरंगा' या अभियानासंदर्भात भाजपची बैठक 6 ऑगस्टला पार पडणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्री या दौऱ्यादरम्यान रविवारी निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 


तसेच या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्ष श्रेष्ठींसोबत देखील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हा दिल्ली दौरा महत्त्वाता समजला जात आहे.