नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) बुधवारी (3 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेनेनं शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी केलेली याचिका उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी येणार आहे. (maharashtra political crisis on 3 august hearing on shiv sena mla diqualificaton petion in supreme court)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याशिवाय शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या नव्या याचिकेवरही उद्याच सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित याचिकांची एकत्रित सुनावणी उद्या सरन्यायाधीश रामण्णा यांच्या खंडपीठापुढं होणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्ट घटनापीठाची स्थापना करणार का? याकडं सगळ्यांच लक्ष लागलंय. 


सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं, यावर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणाराय. सुप्रीम कोर्टाचा उद्याचा निकाल ऐतिहासिक ठरणाराय. कारण या निकालावर शिवसेनेचं अस्तित्वही अवलंबून असणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं या सुनावणीकडे लक्ष असणार आहे.