Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायलयाचा ठाकरे गटाला मोठा धक्का
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे.
मुंबई : राज्यात सत्तांतरानंतर अनेक दिवसांनी मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार झाला. विस्तारानंतर खातेवाटपही झालं. मात्र त्यानंतरही सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) हा अजूनही कायम आहे. या सत्तासंघर्षाबाबत अपडेट समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे. (maharashtra political crisis suprme court rejected uddhav thackeray group request about hearing date)
एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही दावा करण्यात आला. त्यामुळे हा वाद न्यायालयात गेला. शिवसेना कोणाची, शिंदे गटाची की ठाकरेंची याबाबतची पुढील सुनावणी ही येत्या 19 ऑगस्टला निवडणूक आयोगासमोर होणार आहे.
या सुनावणीआधी सत्ता संघर्षावर तातडीनं सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायलयाकडे करण्यात आली. मात्र ही विनंती सुप्रीम कोर्टानं फेटाळलीये. त्यामुळे आता कोर्टात पूर्वनियोजित वेळी म्हणजेच 22 ऑगस्टलाच ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणी काय होतं, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.