बेळगाव : 'जय महाराष्ट्र' लिहिलेली पहिली बस  मुंबई ते बेळगाव, अशी घेऊन जाणाऱ्या एसटीचे चालक आणि वाहक यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नवा वाद उभा राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जय महाराष्ट्र'  लिहिलेली एसटी बेळगावात आल्यानंतर 'जय महाराष्ट्र'च्या  घोषणा दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी चालक आणि वाहक यांच्या सोबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवरही राजद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल आलाय.


 


मदन बामणे, अमर यळ्ळूरकर, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर यांच्यासह अन्य बारा जणांवर राजद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आलाय. १४३,  १४७ आणि १५३ अ कलमाअंतर्गत मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
  



महाराष्ट्र परिवहन महामंडळाची 'जय महाराष्ट्र' अशी लिहिलेली पहिली एसटी बेळगावात दाखल झाली त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी एसटीचे स्वागत केले. आणि जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यासह एसटी चालक, वाहक यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.