बंगळूरू : महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं, असे अकलेचे तारे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी तोडले आहेत. अशा लोकांना महात्मा म्हणून कसं संबोधलं जातं, असा वादग्रस्त सवाल देखील भाजप खासदार हेगडे यांनी केला आहे. बंगळुरूत एका जाहीर कार्यक्रमात बोलताना अनंतकुमार हेगडे यांनी हे विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण स्वातंत्र्य चळवळ ही ब्रिटिशांच्या मदतीने चालवण्यात आली होती. महात्मा गांधी यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह हे देखील ढोंगं होतं, असं भाजप नेते अनंतकुमार हेगडे बरळले आहेत.



तर दुसरीकडे, भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांचं हे विधान देशद्रोही विधानअसून त्यांच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.