मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा  समुहाच्या प्रगतीत अडथळा ठऱणारी दक्षिण कोरियाची कंपनी SsangYong Motor अखेर विकन्यात आली आहे. आनंद महिंद्रा यांचा M&M समूह अनेक महिन्यांपासून कंपनी विकन्याच्या प्रयत्नात होता. परंतू कंपनी घेण्यासाठी कोणताही उद्योग समुह पुढे येत नव्हता. अखेर आता  दक्षिण कोरियाच्या कंपन्यांच्या गटाने कंपनी विकत घेण्याचे मान्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिंद्रा समूहाला योग्य खरेदीदार न मिळाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते. आता दक्षिण कोरियाच्या स्थानिक कंपन्यांच्या गटाने 1800 कोटी रुपयांमध्ये SsangYang मोटर कंपनी खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे. महिंद्राने ही कंपनी 12 वर्षांपूर्वी 2010 मध्ये घेतली होती.


महिंद्रा समूहाचे 12 वर्षापासून SsangYang Motor मध्ये पैसे अडकले होते. परंतु त्यांना योग्य परतावा मिळत नव्हता. यानंतर महिंद्रा ग्रुपने एप्रिल 2020 मध्ये निर्णय घेतला की कंपनी विक्रीस काढावी.


यानंतर महिंद्राने खरेदीदार शोधण्यास सुरुवात केली. सन 2020 संपण्यापूर्वीच, SsangYang Motor 100 अब्ज वोनच्या कर्जामुळे दिवाळखोरीत गेली.


कोरोना विषाणू संसर्गामुळे  SsangYong Motorची आर्थिक परिस्थिती बिघडली. कंपनीची विक्री सतत कमी होत गेली आणि 2021 मध्ये केवळ 84 हजार युनिट्सची विक्री झाली. कंपनीला मोठा तोटा झाला.


SsangYong मोटर ताब्यात घेतल्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा उद्योगाने SUV आणि इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण स्वीकारले, जे यशस्वी झाले नाही. 


70 वर्षे जुनी ही कंपनी 1988 मध्ये SsangYong बिझनेस ग्रुपने Dong-A Motor कडून विकत घेतली होती. हे नंतर देवू मोटर्स आणि SAIC ने विकत घेतली, त्यांच्याकडून महिंद्रा यांनी कंपनी विकत घेतली. आता कंपनी पुन्हा नवीन मालकाकडे गेली आहे.