लखनऊ : Aryan Khan case : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा मुलगा आर्यन खान ( Aryan Khan) प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) लखनऊमध्ये शरण येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणातील आणखी अनेक गुपिते उघड होऊ शकतात, अशी शक्यता आहे. (Main witness of Aryan Khan case Kiran Gosavi will surrender in Lucknow!)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) लवकरच लखनऊमध्ये आत्मसमर्पण करणार आहे. 'झी न्यूज ब्युरो'ला सूत्रांच्या हवाल्याने ही मोठी बातमी मिळाली आहे. आर्यन खान प्रकरणात किरण गोसावीचे नाव मीडियात चर्चेत होते. जेव्हा त्याने आर्यनसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर टाकला होता. मग तो एनसीबीचा कोणीतरी अधिकारी असल्याची चर्चा सुरू झाली. नंतर एनसीबीने स्वतः सांगितले की तो एक खासगी गुप्तहेर आहे आणि या संपूर्ण प्रकरणात 10 साक्षीदारांपैकी फक्त एक आहे.


किरण गोसावी पोलिसांना शरण येणार असल्याच्या वृत्ताने या मोठ्या ड्रग्ज प्रकरणातील अनेक धागेदोरे उघड होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. तपास लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी किरण गोसावी याला कोणत्याही प्रकारे बोलवावे, अशा सूचना एनसीबी मुख्यालयातून मुंबईतील कार्यालयाला देण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत एनसीबीकडून किरण गोसावी याचा शोध घेण्यात येत होता. मात्र अचानक किरण गोसावी याने एका वृत्तवाहिनीवर सांगितले की, तो लखनऊमध्ये आहे. त्याने माडियाव पोलीस ठाण्यात  शरण येण्याची तयारी केली आहे.


किरण गोसावी याच्यावर परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने काही तरुणांना लाखो रुपयांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्राच्या केळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर गोसावी याच्यावर महाराष्ट्र राज्यात चार गुन्हे दाखल करणण्यात आले आहेत.