पश्चिम बंगाल : कोलकातामधील माजेरहाट पूल कोसळून मोठी दुर्घटना घडलेय. पुलाचा एक भाग कोसळल्याने पुलाखाली गाड्या उभ्या असलेल्या गाड्या दबल्या आहेत. या अपघात सहा जण जखमी झाले असून अनेकजण पुलाच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सहा जणांना बाहेर काढण्यात आले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 माजेरहाट पुलाखाली अनेक गाड्या उभ्या होत्या. यामधील अनेक गाड्या ढिगाऱ्याखील दबल्या गेल्यात. यात अनेकजण अडकल्याची भीती आहे. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.



दरम्यान, याआधी कोलकातामध्ये पूल कोसळ्याची दुर्घटना घडली होती. विवेकानंद फ्लायओव्हर दुर्घटनेच्या दोन वर्षांनी ही दुर्घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी कोलकातामध्ये निर्माणधीन विवेकानंद फ्लायओव्हर कोसळला होता. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला होता.