नवी दिल्ली : गेले दोन दिवस म्हणजेच 16 आणि 17 जून दरम्यान दोन नियमांमध्ये बदल झाला आहे. यातील पहिला बदल हा आयकर तर दुसरा बदल हा विमा विभागात झाला आहे. या नव्या नियमांच्या परिणाम थेट तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे.


पहिला नियम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

16 जूनपासून दुचाकींचा थर्ड पार्टी वीमा महागला आहे. वीमा नियामक इरडाच्या निर्देशांनुसार 1000 सीसी पेक्षा कमी क्षमता असणाऱ्या छोट्या कारच्या थर्ड पार्टी प्रिमियममध्ये 12 टक्केंनी वाढ झाली आहे. आता प्रिमियम 1 हजार 850 रुपयांनी वाढ होऊन 2 हजार 072 इतकी झाली आहे. 


तर 1000 ते 1,500 सीसीच्या वाहनांचे वीमा प्रिमियम 12.5 टक्के वाढून 3 हजार 221 रुपये झाले आहे. दुचाकींबद्दल बोलायचे झाल्यास 75 सीसी पेक्षा कमी टूव्हीलरसाठी थर्ड पार्टी प्रिमियम 12.88 टक्क्यांनी वाढून 482 रुपये झाला आहे. तर 75 ते 150 सीसी दुचाकी वाहनांचा प्रिमियम 752 रुपये करण्यात आला आहे. तर 150-350 सीसी क्षमता असलेल्या दुचाकी वाहनांच्या थर्ड पार्टी वीमा प्रमियममध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. 


मोटर व्हीकल्स एक्टनुसार सर्व मोटर वाहनांसाठी थर्ड पार्टी मोटर वीमा किंवा थर्ड पार्टी वीमा कव्हर घेणे गरजेचे आहे. ही वीमा पॉलीसी तुमच्या वाहनाने इतर व्यक्ती किंवा त्यांच्या संपत्तीला झालेले नुकसान भरून काढते. 



दुसरा नियम


या नियमासोबतच 17 जूनला इनकम टॅक्स संदर्भातील नियम बदलला आहे. नवा नियम हा मनी लॉंड्रींग, भ्रष्टाचार, बेनामी संपत्ती ठेवणे आणि विदेशात अघोषित संपत्ती ठेवण्याच्या गंभीर प्रकरणा संदर्भातील आहे. अशा प्रकरणांमध्ये इनकम टॅक्स चोरीतून सुटका मिळणे आता कठीण होणार आहे. या संदर्भात सीबीडीटीने दिशा निर्देश जारी केले आहेत. टॅक्स चोरी प्रकरणात तुम्ही केवळ दंड भरून काढता पाय घेऊ शकत नाही. नव्या नियमानुसार तुम्ही आणखी गोत्यात येऊ शकता. संबंधित व्यक्तीच्या व्यवहारातील गुन्हा किती मोठा आहे हे पाहीले जाईल. तसेच या प्रकरणातील तथ्य आणि परिस्थितींवर लक्ष दिले जाणार आहे.