श्रीनगर : jammu kashmir जम्मू काश्मीरमधील काही प्रांतांमधून दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नांना वेग आला असला तरीही दहशतवादी कारवाया मात्र दर दिवशी एक नवं आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर उभं करत आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ ऑगस्टच्या रात्री जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील तुजन या गावानजीक एका पुलाखाली Improvised Explosive Device (IED) स्फोटकं लावल्याचं निदर्शनास आलं. ज्याची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी त्याचा शोध घेतला आणि मोठा घातपात टळला. 


काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून तुजन आणि दलवान या गावांजवळील रस्त्यावरील एका पुलाखाली ही स्फोटकं घातपाताच्या उद्देशानं ठेवण्यात आली होती. 


सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळं या भागात मोठा हल्ला होताहोता टळला आहे. मुख्य म्हणजे पुलवामा आणि बडगाम या भागांना जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावरुन अनेकद्या सैन्य आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या वाहनांचीही ये-जा असते. त्यामुळं एक मोठं संकट टळलं अशी माहिती समोर येत आहे. 


 


दरम्यान, दहशतवाद्यांशी लढा देण्याचं सत्र सुरु असतानाच काश्मीरच्या काही भागांमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. यामध्ये निवडक भागांमध्ये 4जी आणि उर्वरित भागांमध्ये 2जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.