Gas Cylinder On Railway Track: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये पुन्हा एकदा ट्रेनच्या घातपाताचा कट रचण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कानपूर देहात रेल्वे रूळांवर एक लहान गॅस सिलेंडर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सुदैवाने लोकोपायलटच्या हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अपघात टळला आहे. रेल्वे रूळांवर हा सिलेंडर पाहताच लोकोपायलटने इमरजन्सी ब्रेक लावून गाडी थांबवली व रेल्वे आईओडब्ल्यूला सूचना देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी JTTN मालवाहतूक करणारी ट्रेन कानपूरवरुन प्रयागराजकडून जात होती. त्याचवेळी जेव्हा ट्रेन प्रेमपूर स्थानकावरील लूप लाइनवर आल्यावर लोको पायलटला ड्रायव्हर सिग्नलपासून थोड्याच अंतरावर रेल्वे रूळांजवळ काहीतरी वस्तु पडलेली दिसली. तेव्हा लोकोपायलटने लगेचच इमरजेन्सी ब्रेक लावला आणि गाडी थांबवण्यात आली. त्यांनी लोकोपायलटने ट्रेनमधून खाली उतारल्यानंतर बघितल्यावर त्यांना धक्काच बसला. रेल्वे रूळांवर एलपीजी गॅस सिलिंडर ठेवण्यात आला होता. या घटनेची माहिती लगेचच रेल्वे पोलिसांना देण्यात आली. 


घटनेची माहिती मिळताच रेल्वेने आयओडब्लू, सुरक्षा रक्षक दलसह अन्य पथके घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेल्वे रूळांवरील सिलेंडर लगेचच हटवण्यात आले आणि या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. चौकशी करण्यात माहिती पडले की, हा सिलेंडर पाच किलो वजनाचा असून रिकामा होता. तो रेल्वे रूळांवर ठेवण्यात आला होता. ही घटना प्रेमपुर स्थानकात सकाळी 5.50 वाजता घडली असल्याचे बोललं जातंय. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. 


दरम्यान, 8 सप्टेंबर रोजीदेखील अशीच एक घटना घडली होती. जेव्हा कानपूरमध्ये कालिंदी एक्स्प्रेस ट्रेनच्या रेल्वे रूळांवर सिलेंडरसह अन्य साहित्य सापडले होते. प्रायगराजहून भिवानीकडून जाणाऱ्या कालिंदी एक्स्प्रेसच्या रेल्वे रूळांवर ठेवलेल्या एलपीजी गॅसला धडकली. घटनास्थळावर पेट्रोलने भरलेली बॉटल आणि माचिससोबतच स्फोटकदेखील सापडली होती. या प्रकरणाची चौकशी एनआयएला सोपवण्यात आली होती.