Makar Sankranti 2023: गुळाची पोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार असा झकास बेत संक्रांतीच्या दिवशी असतोच. पण खवय्यांसाठी संक्रांतीइतकेच (Makat Sankranti Special Food) किंबहुना त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे असते ते भोगीच जेवण. संक्रांतीच्या (Makar Sankranti 2023) आदल्यादिवशी म्हणजेच आज (14 जानेवारी 2023) भोगीचा सण साजरा केला जातो. महिलांच्या दृष्टिने हा दिवस महत्त्वाता असला तरी या दिवसाच्या जेवणाची प्रतिक्षा मात्र घरातल्या सगळ्यांनात असेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संक्रांत हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. सणाची नावं वेगवेगळी असली तरी सण साजरा करण्याच उत्साह मात्र तोच असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर प्रांतात भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशीचे जेवण महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ असते.  जसे की, मराठवाडा, कोकण, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणची हिवाळ्यातली खाद्य संस्कृती यानिमित्ताने दिसून येते. 


वाचा: सुगड पूजा आणि नवरीचा ववसा म्हणजे काय? जाणून घ्या पूजा विधी, साहित्य Video च्या माध्यमातून 


भोगीची भाजी आरोग्यासाठी फायदेशी  


  • भोगीची दिवशी भोगीची भाजी बनवताना गाजर, वांगे, घेवडा, तीळ, हरभरा या भाज्या असतात, त्याचबरोबर शेंगदाणेही घातले जातात.

  • थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वा वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी फायदेशीर ठरते.

  • शेंगदाणे आणि तीळामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते. तसेचत्वचेतील कोरडेपणा कमी करण्यास मदत होते.

  • या भाजीसह दूध, दही, तूप, लोणी, ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील

  • शरीराला उब मिळण्यासाठी भोगीची भाजी करण्यात येते. तसंच या भाज्या खाऊन तुमची तब्बेत अधिक चांगली राखण्यास मदत मिळते.


भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरीच का?


  • बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम

  • यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पिठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी. ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते

  • दोन्ही उष्ण असल्याने शरीराला उब मिळून थंडी वाजत नाही 

  • बाजरीची भाकरी बनवण्यासाठी बाजरीचे पीठ घ्यावे आणि पाणी गरम करून ते भिजवावे. घट्ट भिजल्यावर काही वेळ ठेवावे आणि मग पोळपाटावर प्लास्टिकचा कागद घेऊन अथवा डायरेक्ट पोळपाटावर पीठ घालून भाकरी थापावी आणि तव्यावर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यावी. भाजल्यावर लोणी घालून खायला द्यावी. 


भोगीची भाजी कशी करावी?


  • एका कढईत तेल गरम करावे आणि त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, कडिपत्ता आणि लाल तिखट घालून फोडणी द्यावी

  • फोडणी तडतडू लागल्यावर त्यात शेंगदाणे, हरभरे आणि घेवडा या तोडून ठेवलेल्या भाज्या घालाव्यात

  • या भाज्यांना थोडी वाफ आल्यावर त्यात कापलेले वांग आणि गाजराचे तुकडे घालावेत

  • सर्व भाजी शिजत आली की, त्यात चिंचेचा तयार केलेला कोळ, थोडा गोडा मसाला, गूळ, ओलं खोबरं आणि पांढरे तीळ अथवा तिळाचे कूट घालावे

  • वरून मीठ घालून व्यवस्थित ढवळावे आणि शिजवून उकळी काढून घ्यावे. गरमागरम बाजरीच्या भाकरीसह आणि लोण्यासह खायला द्यावे