Makar Sankranti 2023 : सुगड पूजा आणि नवरीचा ववसा म्हणजे काय? जाणून घ्या पूजा विधी, साहित्य Video च्या माध्यमातून

Video Sugad Puja  :  मकर संक्रांत रविवारी 15 जानेवारी 2023 रोजी देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला विशेष महत्त्वं आहे. यादिवशी महिला सुगड पूजा करतात. तर नवविवाहित महिलांसाठी हा सण खास असतो. 

Updated: Jan 14, 2023, 09:52 AM IST
Makar Sankranti 2023 : सुगड पूजा आणि नवरीचा ववसा म्हणजे काय? जाणून घ्या पूजा विधी, साहित्य Video च्या माध्यमातून  title=
video makar sankranti 2023 sugad puja vidhi and Vavsa of bride how to do sugad puja sahitya haldi kunku vaan marathi news

Makar Sankranti 2023 Sugad Puja Video  :  नवीन वर्षाला सुरुवात झाली की, पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत...हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.  महाराष्ट्रातही या सणाला विशेष महत्त्वं आहे. या सणामध्ये तीळ आणि गुळाला जेवढं महत्त्वं आहे तेवढंच सुगड पूजनालाही विशेष महत्त्वं आहे. अनेकांना सुगड पूजा माहिती आहे. पण नवविवाहित महिलांना जर याबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला सुगड पूजा, विधी आणि साहित्य सांगणार आहोत. 

सुगड म्हणजे नेमकं काय? 

 'सुघट' म्हणजे शेती मालांनी भरलेला घट.  नंतरच्या काळात त्याला 'सुगड' (Sugad) म्हणायला लागलं. लाल आणि काळा रंगाचे छोटे माठ म्हणजे घट. पूर्वीच्या काळात मातीचे हे घट नव्हते. त्यावेळी घरातील लहान गडव्यात हे घट मांडले जातं होते. शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी पूजले जाते. (video makar sankranti 2023 sugad puja vidhi and Vavsa of bride how to do sugad puja sahitya haldi kunku vaan marathi news )

 सुगडासाठी लागणारे साहित्य

मोठे काळे सुगड 
त्याहून छोटे लाल सुगड 
हरभरा
 गाजर
ऊस
 तीळ
शेंगदाणे
बोरं
 तिळगुळ,
 हळद, 
कुंकू,
 गव्हाच्या लोंब्या 

पूजेसाठी साहित्य

पाट किंवा चौरंग
लाल रंगाचा कपडा
 हळदी-कुंकू, 
दिवा
रांगोळी,
तांदूळ
 फुले,
तिळगूळ-लाडू 

मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसे करावे?

सुगडाची पूजा ही पाटावर किंवा चौरंग करावी
पाटाभोवती छान रांगोळी काढा
पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे.
पहिले सुगडला पाच ठिकाणी उभं असं हळद-कुंकू लावावं.
आता हे सुगड तांदूळ किंवा गहूवर ठेवावे.
यानंतर सुगडमध्ये एकएक करुन हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या
ओंब्या घालाव्यात. 
काळ्या रंगाचे मोठं सुगड खाली त्यावर लाल रंगाचं सुगड ठेवून दोन्हीत वाण भरावे.
सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा.
यानंतर धूप, दीप अर्पण करावा.
सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा.

नव्या नवरीची पहिली संक्रांत?

काही ठिकाणी मकर संक्रांतीला नव्या नवरीला ववसा दिला जातो.  शिवाय नव्या नवरीला मकर संक्रांतीला काळी साडीसोबत ओटी भरली जाते. तिचा हलव्याच्या दागिन्यांनी साज श्रृंगार केला जातो, अशी परंपरा आहे. 

शिवाय नवीन नवरी पाच वर्ष  वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर वाण म्हणून देते. त्यानंतर ती तिला आवडेल ती वस्तू वाण म्हणून देते.