निवडणुकीत शिवसेनेला सोबत घ्याच; फडणवीसांचा पक्षश्रेष्ठींकडे आग्रह
एकनाथ खडसे यांना मंत्रीमंडळात घेण्याविषयी चर्चा
नवी दिल्ली: लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घ्यावे, अशी आग्री भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील बैठकीत मांडली. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोघांनी सोबत लढायला हवे, असे मत मुख्यमंत्र्यांनी भाजप संघटन सरचिटणीस रामलाल यांच्यासमोर मांडले. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतही चर्चा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी तब्बल चार तास चर्चा केली. यावरुन विष्णू सावरा, बबन लोणीकर, विद्या ठाकूर, प्रवीण पोटेंचे मंत्रीपद धोक्यात आले आहे. तर अतुल सावे, किसन कथोरे, मनिषा चौधरींना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
तसेच शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी कोणती खाते द्यायचे यावरही नेत्यांध्ये खलबतंही झाली. तसेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मंत्रीमंडळात घेण्याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.