नवी दिल्ली : भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीसाठी वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान ओळखपत्र खूपच महत्वाचं आहे. तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नाहीये? तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करु शकता. तसेच जर तुमच्या मतदान ओळखपत्रात चूक असेल तर तुम्हाला शासकीय कार्यालयांमध्ये रांगा लावण्याची गरज उरणार नाही. कारण, तुम्ही घर बसल्या मतदान ओळखपत्रातील चूक दुरुस्त करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ मतदान ओळखपत्रात असलेल्या चुका दुरुस्त करता येणार नाहीत तर तुमचं आयडी अॅप्लिकेशन स्टेटसही तुम्ही ट्रॅक करु शकता. पाहूयात कशा प्रकारे चुका दुरुस्त करता येणार आहेत.


यासाठी युजरला नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल वेबसाईटवर जावं लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला Correction of entries in electoral roll हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. तसेच तुम्ही NVSP च्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म 8 सुद्धा भरु शकता. 


ज्यावेळी वोटर सर्व्हिस पोर्टल वेबसाईटवर गेल्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर प्रथम भाषा निवडा. त्यासोबतच इतर आवश्यक माहिती भरा.


यानंतर स्क्रोल करुन खाली या आणि एंट्रीवर क्लिक करुन आवश्यक ते बदल करा. मग, त्याच्याशी संबंधित माहिती किंवा कागदपत्र तुम्ही अपलोड करु शकता. 


मग, इतर आवश्यक माहिती भरावी लागेल त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. 


यानंतर तुमच्या ई-मेल आयडीवर अर्जाची माहिती येईल. या माहितीच्या आधारे तुम्ही अॅप्लिकेशन स्टेटस ट्रॅक करु शकता.