नवी दिल्ली : टाटा समूह आणि अमेरिकन विमान कंपनी लॉकहिड मार्टीन यांच्यात झालेल्या नव्या करारानुसार जगातली सर्वात आधुनिक लढाऊ विमानं म्हणून प्रसिद्ध अशी F16 विमानं येत्या काही वर्षात भारतात तयार होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाला या करारामुळे मोठी उभारी मिळणार आहे. दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ड़ोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणालाही या करारानं कुठलाही धक्का लागणार नाही, असं लॉकहिड मार्टीननं स्पष्ट केलंय.


पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. त्याआधी हा करार जाहीर करण्यात आल्यानं भारत-अमेरिका व्यापारी संबंधानांही नवी बळकटी मिळणार आहे. 


फ्रान्समध्ये सुरू झालेल्या पॅरिस एअर शोच्या पार्श्वभूमीवर लॉकहिड मार्टीन आणि टाटा समूहात हा करार करण्यात आलाय. या अभूतपूर्व करारानं जगातली सर्वात मोठी युद्ध सामुग्री तयार करणारी कंपनी लॉकहिड आणि भारतातील सर्वोत्तम उद्योग समूहांपैकी एक असणारा टाटा समूह एकत्र येत आहेत. 


या कंपन्यांच्या संयुक्त विद्यमानं भारतात F16 BLOCK 70 जातीची विमानं तयार करून जगभरात निर्यात करण्यात येतील.