Boycott Maldives: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर भारतासह जगभरात लक्षद्वीप ट्रेंडिगमध्ये आहे. लक्षद्वीपचे सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल. मात्र, पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवचे टेन्शन वाढले आहे. कारण मालदीवच्या तुलनेत लक्षद्वीपचे सौंदर्य दुपटीने अधिक आहे. त्यामुळं लाखो रुपये खर्च करुन मालदीवला जाण्याऐवजी लक्षद्वीप चांगला पर्याय आहे. असाच विचार भारतीय करत आहेत. इंटरनेटवर लक्षद्वीपची चर्चा असतानाच मालदीवचा मात्र जळफळाट होताना दिसत आहे. भारतीयांविरोधात निगेटिव्ह ट्विट करण्यास सुरुवात केली आहे. मालदीवचा सत्ताधारी पक्षातील एका नेत्यानेही भारताविरोधात एक ट्विट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालदीवचा सत्ताधारी पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम)चे नेते जाहिद रमीज यांनी भारतीयांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केला आहे. त्यासोबतच मालदीवच्या ट्रोल आर्मीनेही भारताविरोधात ट्विट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं भारतीयांचा संताप होत आहे. यानंतर भारतात ट्विटरवर #BoycottMaldives हे अभियान सुरु झाले आहे. लोक मालदीवचा विरोध करताना दिसत आहेत. 


मालदीवचे नेते जाहिद रमीज यांनी पंतप्रधान मोदी यांच्या लक्षद्वीपच्या यात्रेचा एक व्हिडिओ रीट्वीट केला आहे. यात त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, चांगलं पाऊल टाकलं आहे. मात्र, आमच्यासोबत तुलना करण्याचा विचार भ्रामक आहे. ते आमच्याकडून दिली जाणारी सुविधा कशी काय देणार आहेत. ते इतकी स्वच्छता कशी ठेवू शकणार आहात. खोल्यांमध्ये येणारी दुर्गंधी ही खूप मोठी समस्या आहे. 



मालदीवच्या नेत्याने केलेल्या या ट्विटमुळं लक्षात येते की, पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यामुळं मालदीवच्या पर्यटनाला मोठा झटका बसला आहे. युजर्स जाहिद रमीजच्या या ट्विटचा विरोध करत आहेत. भारत नेहमीच मालदीवची मदत करत आला आहे. भारतीय लोकही लाखो रुपये खर्च करुन मालदीवला फिरण्यासाठी जातात. पर्यटनावरच देशाची अर्थव्यवस्था टिकून आहे. लोकांना रोजगार मिळतो. असं असतानाही मालदीव भारताविरोधात टिप्पणी करतात. मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मोइजू सुरुवातीपासून भारताच्या विरोधात असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी पदभार स्कीकारल्यानंतर पहिले तुर्कीची यात्रा केली आणि नंतर चीनला जाण्याचा विचार बोलून दाखवला होता.