Congress President Election : मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष; `इतक्या` मतांनी उडवला थरुर यांचा धुव्वा
Congress President Election : नुकत्याच पार पडेलल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आणि काँग्रेस अध्याक्षांचं नाव जाहीर झालं.
Congress President Election : अखेर तो क्षण आला आणि तब्बल 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीच्या हाती काँग्रेच्या अध्यक्षपदाची सूत्र गेली. नुकत्याच पार पडेलल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आणि काँग्रेस अध्याक्षांचं नाव जाहीर झालं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मल्लिकार्जुन खरगे यांनी शशी थरुर यांचा या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत पराभव केला. तब्बल 7897 मतांनी खरगेंचा विजय झाला. तर, थरूर यांना अवघी 1072 मतं मिळाली. या निवडणुकीत 416 मतं बाद ठरली. (mallikarjun kharge wins the Congress presidential elections over shashi Tharoor )
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान करण्यात आलं. यामध्ये 9 हजारांहून अधिक प्रतिनिधींनी विविध PCC कार्यालय आणि AICC मुख्यालयात मतदान केलं होतं. तिथे मतमोजणीचा दिवस उजाडला आणि इथे सुरुवातीपासूनच खरगे समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर जमा होत विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती.
1998 पासून सोनिया गांधी (Sonia Gandhi) काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदी विराजमान गोत्या. तर, त्यांचे सुपुत्र राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीसुद्धा काही काळासाठी या पदाची जबाबदारी सांभाळली. पण, 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांच्या मते, अध्यक्षपदासाठी आतापर्यंत 1939, 1950, 1977, 1997 आणि 2000 या वर्षांमध्ये निवडणुका लढवल्या गेल्या आहेत. यानंतर तब्बल 22 वर्षांनंतर अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका घेण्यात आल्या. ज्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.