नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांची आज बैठक बोलवाली आहे. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नकार दर्शविला आहे. तसेच एनडीएचे घटक पक्ष म्हणून राहिलेले टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, डीएमकेचे नेते स्टॅलिन, आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या बैठकीकडे पाठ दाखवली आहे. त्यांनीही मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मोदींनी इतक्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी फक्त एक दिवस चर्चा करणे पुरेसे ठरणार नाही. ‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना अनेक विरोधी पक्षांनी डावलली आहे. अनेक नेत्यांनी सरकारने चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रणही नाकारले आहे. यावर सखोल चर्चा होण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. आधी प्रत्येक राजकीय पक्षांना याचा अजेंटा द्या आणि याबाबत तज्ज्ञांचीमध्ये घेणे आवश्यक असताना घाई कशासाठी, असा सल्ला ममता यांनी दिला आहे. दरम्यान, तृणमुल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या बैठकीस आपण हजर राहणार नसल्याचे मंगळवारीच स्पष्ट केलेले आहे. 



तर दुसरीकडे मोदींनी आज आयोजित केलेल्या सर्व पक्ष प्रमुखांच्या बैठकीस तेलगु देसम पार्टी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू, द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन, आम आदमी पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल हेही उपस्थित राहणार नाहीत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, सीपीआयचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी हे मात्र या बैठकीला जाणार आहेत. तर चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाच्यावतीने जयदेव गाला हे या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीच्यावतीने राघव चढ्ढा हे या बैठकीस जाण्याची शक्यता आहे.