नवी दिल्ली : पश्चिम बंगालसहित देशभरात सुरु असलेल्या डॉक्टरांच्या संपावर शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी मृत्यूला घाबरत नाही तर मृत्यू मला घाबरतो. मला थांबवण्याची हिम्मत कोणामध्ये नसल्याचे विधान त्यांनी केले आहे. मी जेव्हा बिहार, यूपी आणि पंजाबला जाते तेव्हा हिंदीमध्ये बोलते. कारण आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे. पण जर तुम्ही बंगालमध्ये आलात तर तुम्हाला बांगला बोलावी लागेल. निवडणुकीनंतरच राज्यात हिंसाचार झाला आहे. आम्ही बंगालचा गुजरात बनू देणार नाही. बंगालमध्ये हिंसाचार पसरवण्याची तयारी सुरु आहे. अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहेत. पण गुंडागर्दी करणाऱ्यांना बंगालमध्ये कोणते स्थान नसल्याचे त्या म्हणाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही अशुभ शक्तींची नजर बंगालवर आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मार खात आहे. बंगालचा विकास करावा लागेल. आम्हाला ईव्हीएम नको, आम्हाला बॅलेट पेपर हवा आहे. यासाठी 21 जुलैला आंदोलन होणार आहे. 


बंगालमध्ये राहुन तुम्ही बंगाल्यांना घाबरवणार ? मी हे अजिबात सहन करणार नाही. मला इतके का घाबरता ? आमची लढाई ही लोकशाहीची लढाई आहे. पोलिसांनी जर काम केले नाही तर जनता कुठे जाईल ? फायदा उचलण्यासाठी सर्व पार्टी बदलत आहेत. माकपाला दिलेले मत भाजपाला कसे मिळाले ? माकपाने आपला साइन बोर्ड स्वत: तयार केल्याचे त्या म्हणाल्या. 



शिविगाळ करुन मला काही मिळणार नाही. मला जितक्या शिव्या द्याल तितक्या अधिक जागा आम्ही जिंकू. ममता बॅनर्जी ही करोडपतीची मुलगी नाही आहे. त्यामुळे मला शिवी देणे सोप्पे असल्याचे त्या म्हणाल्या.