भवानीपूर : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. यासह मुख्यमंत्रिपद वाचवण्यातही त्या यशस्वी झाल्या आहेत. ममता बॅनर्जींनी येथे एकतर्फी विजय मिळवत भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांचा 58,839 मतांनी पराभव केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती कारण त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्यासाठी विधानसभेचे सदस्य असणे आवश्यक होते.


ममतांच्या प्रतिस्पर्धी प्रियंका तिब्रेवाल म्हणाल्या की, मी पराभव स्वीकारते. त्यांनी ममता बॅनर्जी यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. विजयानंतर ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर उत्सव साजरा केला जात आहे. कार्यकर्ते एकमेकांना मिठाई खायला देत आहेत आणि विजय साजरा करत आहेत. ममतांनी त्यांच्या घराबाहेरच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.


ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरच्या जनतेचे आभार मानले. विजयानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'कोणताही कार्यकर्ता विजय साजरा करणार नाही. ते पूरग्रस्तांना मदत करतील. त्यांनी केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला आहे. ममता म्हणाल्या की, 'नंदीग्राम न जिंकण्याची अनेक कारणे आहेत. लोकांनी अनेक कट उधळून लावले. मुख्यमंत्री ममता म्हणाल्या की, 'भवानीपूरमधील 46 टक्के लोकं बंगाली नाहीत.'