नवी दिल्ली : पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्यासाठी सीबीआयशी टक्कर घेणाऱ्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा आपला विजय असल्याचं म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयान, शारदा चीटफंड घोटाळा प्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, न्यायालयानं राजीव कुमार यांच्या अटकेला मात्र स्थगिती दिलीय. कोर्टाच्या निर्णयानंतर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देतना म्हटलं, आम्ही कधीही राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी नकार दिलेला नाही. आम्हाला केवळ या गोष्टीवर आक्षेप होता की सीबीआयनं राज्य सरकारला सूचना दिल्याशिवाय पोलीस आयुक्तांना अटक करण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिक वाचा :- ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी सरकार : सुंदरबनाच्या दलदलीत कोण उमलणार?


सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच आहे. या निर्णयामुळे लोकशाहीचाच विजय झालाय. हा देशातील सुरक्षा दलाचा आणि सामान्य जनतेचा विजय आहे. आज देशातील प्रत्येक घटकाला त्रास दिला जातोय. कोर्टानं हे रोखण्याचंच काम केलंय. केंद्राच्या चौकशी समित्यांनी राज्य सरकारच्या परवानगीशिवाय किंवा चर्चा केल्याशिवाय सरळ राज्यात येऊ नये, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. 


अधिक वाचा :- सीबीआय विरुद्ध पोलीस आणि ममता बॅनर्जी यांचं 'राज'कारण


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय पश्चिम बंगाल पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची शिलांगमध्ये चौकशी करणार आहे. परंतु, राजीव कुमार यांच्या घराची झाडाझडती मात्र सीबीआयला घेता येणार नाही. सोबतच सीबीआयला राजीव कुमार यांना अटकही करता येणार नाही.