Extra Marital Affairs News : विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका महिलेचे केस कापून तिला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी केलेल्या तपासामध्ये सख्या भाचासोबत संबंध ठेवल्यामुळे त्याच्या पत्नीने महिलेला मारहाण केल्याचं बोललं जात आहे. मात्र या कथित प्रेम प्रकरणामध्ये संबंधित युवकाने आपलं जीवन संपवलं होतं. (Mami Bhanja extra marital affair west bangal Marathi Crime news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय आहे प्रकरण? 
मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे तिच्या भाच्यासोबत अवैध संबंध असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केली होती. तरुणाने आत्महत्या केल्यानंतर महिला पळून गेली होती. दुसरीकडे आत्महत्या केलेल्या तरुणाची पत्नी आणि कुटुंबीयांनी शुक्रवारी महिलेला पकडले. पती गमावल्याच्या रागातून पत्नीसह तिच्या कुटुंबीयांनी महिलेला बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर तिचे केस कापून परिसरात फिरवले.


आत्महत्या केलेल्या तरुणाच्या पत्नीने सांगितलं की, दहा वर्षांपूर्वी तिचं लग्न झाले होत, पती ड्रायव्हर होता आणि त्यांना दोन मुले आहेत. कॉलनीतीलच सविता नावाच्या महिलेशी तिच्या पतीचे अनैतिक संबंध होते. मात्र याला विरोध केल्यावर महिलेने पतीसोबत संबंध ठेवणार नसल्याचे सांगितले पण ती काही सुधारली नाही.


कॉलनीतील लोकांना तरूणाच्या पत्नीने अफेरबाबत सांगितलं आणि त्या महिलेची समजूत काढायला सांगितली होती. तरीही त्या महिलेला तरूणासोबत संबंध ठेवायचे होते यावरून दोघांमध्ये भांडणे व्हायचीत. एक दिवशी तिचा पती कामावर गेला आणि त्याने तिकडेच अॅसिड पिऊन आपलं जीवन संपवलं. 


या घटनेनंतर ती महिला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिला पकडलं. तरूणाच्या कुटुंबियांनी तिला मारहाण करत तिचे केस कापून परिसरात फिरवलं. पोलिसांना याची माहिती होताच त्यांनी महिलेला त्यांच्यासोबत नेलं असून पुढील प्रकरणाता तपास करत आहेत. ही घटनाा पश्चिम बंगालमधील मालदा इथली आहे.