बंगाल : बंगालच्या सीएम ममता बॅनर्जीं यांनी नंदीग्रामची निवडणूक शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात जरी हरली असली, परंतु बंगालच्या इतर जागांवर त्यांनी ही निवडणूक प्रचंड मतांनी पद्धतीने जिंकली आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जीं यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी कोणताही अडथळा नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 अनुसार त्या पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. घटनेच्या या कलमानुसार जो मंत्री सलग 6 महिने राज्य विधानसभेचा सदस्य पदावर नसतो तो मंत्री मुख्यमंत्री पदावर बसु शकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता ममता बॅनर्जी यांना 6 महिन्यांच्या आत कोणत्याही विधानसभा जागेवरून निवडणूक जिंकून यावे लागेल. त्या जेव्हा 2011 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या, तेव्हा त्या फक्त खासदार होत्या. काही महिन्यांनंतर त्या भवानीपूरच्या आमदार झाल्या. आता पुन्हा एकदा परिस्थिती अशी आहे की, दीदींनी त्यांची सीट गमावली आहे, त्यामुळे आता त्यांना दुसर्‍या सीटवरुन निवडून यावे लागेल.


6 महिन्यांच्या आत करावी नोंदणी


आता ममता बॅनर्जींनी नंदीग्रामची जागा गमावली आहे. घटनेनुसार मुख्यमंत्रिपदासाठी 6 महिन्यांच्या आत कोणत्याही विधानसभा जागेवरून त्यांना विजयी व्हावे लागेल त्यानंतर त्या मुख्यमंत्री पदासाठी पात्र ठरतील. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या म्हणण्यानुसार 6 महिन्यांत ममता निवडणूक जिंकण्याविषयी कोणालाही कायदेशीर अडचण येणार नाही.


दीदींचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा


बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. त्या सलग तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री होणार आहेत. बंगाल निवडणूक ममता बॅनर्जी आणि भाजप या दोघांसाठीही खूप चुरसीची लढाई ठरली होती. आता ममता बॅनर्जी यांनी बंगाल जिंकला आहे. टीएमसीला आणखी 212 जागा मिळाल्या आहेत. परंतु या सगळ्यात नंदीग्रामची महत्वाची सीट त्यांनी गमावली, मात्र ममता बॅनर्जी सतत मतमोजणीच्या मागणीवर ठाम होती. परंतु निवडणूक आयोगाने त्यांची मागणी फेटाळली.