नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. गुजरातमध्ये त्या सरकारच्या जीएसटी लागू केल्याच्या निर्णया विरोधात रॅली करणार आहेत. ममता, भाजपाच्य़ा विरोधक आहेत.  2019 पर्यंत राज्याच्या निवडणुकीआधी ममता बॅनर्जींना पक्षाची स्थिती मजबूत करायची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीएमसीचं म्हणणं आहे की, जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे गुजरातचे व्यापारी असमाधानकारक आहेत. यामुळे गुजरातमध्ये ममतांसाठी हा मोठा मुद्दा असू शकतो.


ममता भाजपच्या प्रत्येक पायरीला विरोध करण्यास तयार आहेत. 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदीच्या पूर्वसंध्येला देशभरात भाजपा उत्सव साजरा करेल तेव्हा ममतांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोध करण्यासाठी सांगितलं आहे. त्यांचा पक्ष काळा दिवस म्हणून हा दिवस साजरा करेल. ममता या दिवशी दिल्लीतील विरोधी पक्षांसोबत चर्चा करु शकतात.