लखनऊ : मुघल बादशहा बहादुर शाह जफरचा वंशह असण्याचा दावा करत प्रिंस याकूब हबीबउद्दीन तुसीने रामजन्मभूमी-बाबरी मस्जिदवर मालकी हक्क सांगितला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी या वादग्रस्त स्थळाचा मुख्य बनवण्याची मागणीही केली आहे. याकूबने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, बाबरी मस्जिद मुघल बादशाह बाबरची होती. मी मुघलांचा वंशज आहे. त्यामुळे मी बाबरी मस्जिदचा मालक आहे’. 


हा दावा करताना याकूबने एक डिएनए रिपोर्टही सादर केला. मात्र या डिएनए रिपोर्टची सत्यता पडताळण्यात आलेली नाहीये. याकूबने उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाकडे त्याला बाबरी मस्जिदचा मुख्य बनवण्याची मागणी केली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांची भेट घेऊन आपली दावेदारी सादर केली. त्यावर मंत्र्यांनी त्यांना सुन्नी वक्फ बोर्डाकडे अर्ज करण्यास सांगितले होते. 


ते म्हणाले की, जर सुन्नी वक्फ बोर्ड यावर अंमलबजावणी करणार नसेल तर मी कोर्टात जाणार आहे. न्यायालयातून विजय मिळाल्यानंतर ते अयोध्या वादावर बातचीत करून पडदा टाकतील. याकूबने चर्चा करून या वादाचे निरसन करण्याच्या श्री श्री रविशंकर यांच्या भूमिकेचं स्वागत केलंय. ते म्हणाले की, ‘मी त्यांना भेटलो आहे आणि त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. या वादावर सौहार्दपूर्ण मार्ग निघावा, असे त्यांना वाटते. तर १९९२ च्या विध्वंसापासून ते आतापर्यंत बाबरी मस्जिदवर दावा का केला नाही? असा प्रश्न विचारल्यावर यावर त्यांनी उत्तरच दिले नाही.