सावधान...एका तासात जीव जावू शकतो, कोरोनावर हा उपाय कधीच करु नका
व्यक्तीला सुरवातीला हलका ताप आला होता, नंतर त्याला असे वाटले की, त्याला कदाचीत कोरोना झाला असावा.
भोपाळ : मध्यप्रदेशातील एका व्यक्तीने कोरोना व्हायरसवर उपाय म्हणून केरोसीन प्यायला. ज्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले. त्या व्यक्तीला सुरवातीला हलका ताप आला होता, नंतर त्याला असे वाटले की, त्याला कदाचीत कोरोना झाला असावा. त्याने याबद्दल त्याच्या मित्राला सांगितले, त्यावेळेस त्याच्या मित्राने त्याला केरोसीन प्यायचा सल्ला दिला. मित्राने मस्करीत दिलेल्या सल्ल्याला या व्यक्तिने खरे मानून स्वत: चे प्राण गमावले आहेत. धकाकादाय गोष्ट अशी आहे की, त्याच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. म्हणजे त्याला कोरोना झालाच नव्हता.
ही घटना भोपालमधील अशोका गार्डनमधली आहे. इथे रहाणारा महेंद्र हा काही दिवसांपूर्वी आजारी पडला होता. औषध घेतल्यानंतरही त्याला बरे वाटत नव्हते. त्यामुळे त्याला असा संशय आला की, कदाचीत त्याला कोरोना झाला असाव. त्याने या बद्दल त्याच्या मित्राला सांगितले.
तेव्हा त्याच्या मित्राने त्याला केरोसीन प्यायचा सल्ला दिला. त्याचा मित्र त्याला म्हणाला की, केरोसीन कोरोना विषाणूवर असरकारक आहे, त्यामुळे केरोसीन तुझ्या शरीराती कोरोना विषाणुंचा नाश करेल. महेंद्र मित्राने मस्करीत दिलेल्या सल्ल्याला खरे मानून केरोसीन प्यायला आणि त्याची तब्येत आणखी बिघडली.
महेंद्रची तब्येत खराब होत आहे हे पाहून त्याच्या घरच्यांनी त्याला रुग्णालात नेले. परंतु तेथून त्याला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा डॅाक्टरांना त्यांना सल्ला दिला. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचताच तेथील डॅाक्टरांनी महेंद्रला मृत घोषीत केले. पोस्टमॅार्टम रिपोर्ट दरम्यान हे समोर आले की, त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.