मित्राच्या धगधगत्या चितेवर तरुणाने उडी घेतली, आक्रोश- किंकाळ्यांनी हादरली स्माशानभूमी
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथे एक भयंकर घटना घडली आहे. मित्राच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने त्याच्या सरणावर उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात तो गंभीररित्या होरपळला आहे. काही गावकऱ्यांच्या मते मित्राची चिता जळत असताना त्याना चक्कर आली आणि तो धगधगत्या चितेवर कोसळला. मात्र अद्याप कोणीही याबाबत नेमकी माहिती सांगू शकलेलं नाहीये.
Man Falls On Friends Pyre: उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथे एक भयंकर घटना घडली आहे. मित्राच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने त्याच्या सरणावर उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात तो गंभीररित्या होरपळला आहे. काही गावकऱ्यांच्या मते मित्राची चिता जळत असताना त्याना चक्कर आली आणि तो धगधगत्या चितेवर कोसळला. मात्र अद्याप कोणीही याबाबत नेमकी माहिती सांगू शकलेलं नाहीये.
९० टक्के भाजला
नगला खंगर परिसरातील हे प्रकरण आहे. ३२ वर्षीय अशोक कुमार कँन्सरने ग्रस्त होता. शनिवारी सकाळी ६ वाजता त्याचा मृत्यू झाला. अशोकच्या अत्यंविधीवेळी सर्व गावकरी उपस्थित होते. त्याचा मित्र आनंद जादौन हादेखील अत्यंविधीसाठी स्मशानभूमीत उपस्थित होता. अंत्यसंस्काराचे विधी झाल्यानंतर अशोकला अग्नी देण्याचा विधी करण्यात आला. त्याचवेळी आनंद अचानक बेशुद्ध झाला व तो चितेवरच कोसळला. यात तो ९० टक्क्यापर्यंत भाजला आहे. या घटनेने परिसर गोंधळ आणि किंकाळ्यांनी हादरला.
रुग्णालयात दाखल
गावकऱ्यांनी आनंदला तातडीने ट्रामा सेंटर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची अवस्था नाजूक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी आग्राच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यास सांगितले.
आनंदला चार मुली
मयत अशोक यांच्या भाच्याने सांगितल्यानुसार, अशोकची चिता जळत असताना आचानक आनंदला चक्कर आली आणि तो थेट चितेवर कोसळला. जळत्या चितेवर कोसळल्याने आनंद ९० टक्के भाजला होता. आनंदला चार मुली आहेत. तो मित्राच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता त्याचवेळी त्याच्यावर भंयकर प्रसंग ओढावला आहे.
गावकऱ्यांचा वेगळाच दावा
दरम्यान, या सर्व प्रकरणावर गावात वेगवेगळ्या वावड्या उठत आहेत. काही जणांच्या सांगण्यावरुन आनंदने जळत्या चितेवर उडी घेतली होती. मित्र अशोकच्या मृत्यूचा त्याला मोठा धक्का बसला होता त्यामुळं दुखी होऊन त्याने जळत्या चितेत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असं काही गावकरी सांगत आहेत. मात्र तिथे उपस्थित असलेला कोणीही प्रत्यक्षदर्शी उघड उघडपणे या विषयावर बोलण्याचे टाळत आहे.
गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, गावात कँन्सरमुळं एका तरुणाचे निधन झाले. घाटावर त्याच्यावर अंत्य संस्कार सुरू असताना एक दुर्घटना घडली. इतकंच सांगण्यात येत आहे.