जयपूर : संजय लीला भंसाली यांचा 'पद्मावती' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे. पद्मावती सिनेमाच्या एका मागून एक अडचणी वाढत आहेत.


किल्ल्यामध्ये मृतदेह आढळला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पद्मावतीला विरोध अजूनही कायम आहे. पण हा विरोध आता हत्येपर्यंत पोहोचला आहे. जयपूरच्या नाहरगड किल्ल्यामध्ये एक मृतदेह आढळला आहे. जो लटकलेल्या अवस्थेत आहे. पद्मावती सिनेमाशी संबधित ही हत्या असल्याचं बोललं जातंय.


हत्या की आत्महत्या?


जयपूरच्या नाहरगढमध्ये मिळालेला मृतदेह हा आत्महत्या असल्याचं बोललं जातंय. पण जेथे मृतदेह सापडला आहे तेथे एक पद्मावतीला धमकावणारे लिखान देखील आढळलं आहे. या ठिकाणी एका दगडावर लिहिलं आहे की, 'आम्ही फक्त पुतळे नाही लटकवत पद्मावती'.



फोटो सौजन्य - एएनआय 


चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात


अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेला पद्मावती हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटात भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या व्यक्तीचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे आणि राणी पद्मावती यांचे चरित्र चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप आहे. पद्मावती सिनेमात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात आक्षेपार्ह चित्रण दाखवलं, राणी पद्मावतीचं चुकीचं चित्रण चित्रपटात केलं गेलं असा आंदोलकांचा आरोप आहे.