Man Inked Rajma Chawal Tattoo On His Arm: तुम्हाला एखादा पदार्थ किती आवडतो, असं विचारलं तर काय उत्तर द्याल? तुम्ही तो पदार्थ किती छान आहे, तो खाण्यासाठी तुम्ही कितीही प्रवास करु शकता वगैरे वगैरे सांगाल. तसेच तो पदार्थ कुठे सर्वोत्त मिळतो किंवा कोणाला तो छान जमतो याची यादीही तुम्ही वाचवून दाखवाल. मात्र तुमच्या आवडत्या पदार्थाचं नाव टॅटूच्या रुपात शरीरावर गोंदवून घेण्यास सांगितलं तर तुम्ही समोरच्याला वेड्यात काढाल. हो की नाही? पण एका व्यक्तीने खरोखरच त्याच्या आवडत्या पदार्थाच्या नावाचा टॅटू आपल्या हाताच्या दंडावर कोरुन घेतला आहे. विशेष म्हणजे हा पर्मनंट टॅटू (Permanent Tattoo) आहे.


...म्हणून काढला टॅटू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तीने आपल्या आवडीच्या आणि उत्तर भारतामध्ये फार लोकप्रिय असलेल्या पदार्थाचं नावं दंडावर कोरलं आहे. या व्यक्तीने हातावर 'राजमा चावल' (Rajma Chawal) असं लिहून घेतलं आहे. हा पर्मनंट टॅटू असून हा पदार्थ फार आवडत असल्याने नाव कोरल्याचं या व्यक्तीने सांगितलं. या टॅटूचा फोटो स्विगीने (Swiggy) आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला आहे. 


कॅप्शन चर्चेत


फूड डिलेव्हरी अॅप असलेल्या 'स्विगी'ने हिंदीत राजमा चावल असं लिहिलेल्या या टॅटूचा फोटो शेअर केला आहे. हा टॅटू या व्यक्तीने आपल्या उजव्या हातावर काढला आहे. "कधी एखाद्या गोष्टीवर इतकं प्रेम केलं आहे का तुम्ही की ती कायम सोबत रहावी यासाठी तुम्ही असे काही प्रयत्न केलेत," अशा अर्थाची कॅप्शन 'स्विगी'ने दिली आहे. 



कमेंट्सचा पाऊस


सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली असून ट्विटर युझर्सने कमेंट सेक्शनमध्ये आवडत्या पदार्थाचा टॅटू काढायचा झाल्यास आपण कोणता टॅटू काढू हे सांगितलं आहे. "मी एका हातावर वडापाव काढेल आणि दुसऱ्यावर पावभाजी" असं एकमाने म्हटलं आहे.