मुंबई : जेव्हा तुम्ही एखाद्याला आर्थिक मदत करता, तेव्हा तुम्ही ते तुम्हाला परतफेड करतील अशी अपेक्षा करत नाही, विशेषत: जर रक्कम फारच कमी असेल तर ती आपल्या लक्षातही राहत नाही. अशीच काहीशी एक घटना सध्सा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. एका व्यक्तीनं लिंक्डइनवर एक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्या व्यक्तीनं एक दिवस अचानक एका अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळाल्याचे सांगितले. याची खरी कहाणी वाचून तुम्हालाही आश्चर्य होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमल सिंह नावाच्या युजरने दोन दिवसांपूर्वी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यानं पैसे परत मिळण्यामागची गोष्ट शेअर केली. पोस्ट शेअर करताना, कमल सिंह म्हणाला की त्याला PhonePe वर एका व्यक्तीकडून अचानक  201 रुपये मिळाले. जेव्हा त्याने त्याचे कारण विचारले तेव्हा त्याला कळले की त्याने सुमारे 1.5 वर्षांपूर्वी सोशल मीडिया साइटवर निधी उभारणीचे आवाहन वाचून एक छोटीशी मदत म्हणून त्या व्यक्तीला पैसे दिले होते. पोस्टमध्ये त्याने त्या व्यक्तीसोबत केलेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.


स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की 7 जुलै 2021 रोजी कमलने 201 रुपयांची मदत केली होती. पैसे पाठवताना त्याने मेसेजमध्ये लिहिले की, 'ही माझ्याकडून छोटीशी मदत आहे, तुझ्या आईची काळजी घे.' सुमारे दीड वर्षानंतर अचानक कमल सिंग यांच्या मोबाईलवर 201 रुपये परत आले. यावर कमल सिंह यांनी 'तुझी आई कशी आहे' असा प्रश्न विचारला. त्या माणसाने उत्तर दिले, 'ती ठीक आहे आणि माझा व्यवसायही चांगला चालला आहे.' ते पुढे म्हणाले की, गरजेच्या वेळी लोकांकडून घेतलेले सर्व पैसे ते परत करत आहेत. यावर कमल सिंह म्हणाले, 'पैशाच्या लालसेने भरलेल्या या जगात त्याच्या प्रामाणिकपणाचे मला खूप आश्चर्य वाटते.'



कमल सिंह यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्या पोस्टला 1 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केलं. अनेककांनी या पोस्टवर कमेंट करत त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचे कौतूक केले. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की, 'कमल सिंग ही एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा होती.'