Viral Video :  सोशल मीडिया म्हणजे व्हिडीओचा खजिना. वेगवेगळे व्हिडीओ या सोशल मीडियावर पाहिला मिळतात. सोशल मीडियावर अजून एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. तुम्हाला शाहरुख खानचा लुंगी डान्स आठवतो. या व्हिडीओमध्येही असाच एक जबरदस्त डान्स पाहिला मिळतो. हा डान्स सोशल मीडियावर तुफान गाजतोय. 


'या' गाण्यावर थिकरला हा व्यक्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 साधारण चाळीशीच्या घरातील या व्यक्तीने प्रभु देवाच्या गाण्यावर डान्स केला आहे. 1993 मधील Gentleman या चित्रपटातील प्रभु देवाचं प्रसिद्ध गाण 'चिक्कू बुक्कू रायली' यावर हा व्यक्ती थरकला आहे. विशेष म्हणजे शर्ट आणि लुंगी घालून रस्त्यावर त्याने हा डान्स केला आहे.  


प्रभू देवाची हुबेहुब नक्कल



या व्हिडीओमध्ये या व्यक्तीने प्रभु देवाच्या डान्सची हुबेहुब नक्कल केली आहे. या व्यक्तीने मूनवॉक पण केला आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीचा डान्स जबरदस्त व्हायरल होतोय. सोशल मीडियावर या व्हिडीओला आतापर्यंत सर्वाधिक व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ Instagram वर शेअर करण्यात आला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Raj Kumar (@rajkumar.984045)


यांनीही केलं कमेंट्स



या लुंगी मास्टरचा डान्स पाहून तेलुगू अभिनेता राचा रवि आणि क्रिकेटर संजू सेमसन हेही कंमेट्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. रवि यांनी या व्हिडीओवर आग आणि दिलवाला इमोजी तर मिस्टर सेमसनने उघड तोंड आणि ओके इमोजीसोबत स्माइली शेअर केली आहे. एका यूजरने तर असं म्हटलं आहे की, ''काका तुम तो छा गए. वय ही फक्त संख्या आहे.'' तर दुसरा यूजर म्हणतो, ''डान्स कायम डान्स असतो.'' तर तिसरा यूजर म्हणतो, ''बाप रे, कमाल आहे हे.''