केरळ : येथील कोल्लम या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क सर्पदंश देवून पतीने पत्नीची हत्या केल्याचं समोर येत आहे. सध्या पोलिसांनी पती सुरजला अटक केली आहे. सुरजने पत्नीला जीवे मारण्यासाठी दोन सापांचा वापर केला होता. ७ मे रोजी ही घडना घडली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत साप चावल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु महिलेच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी घडल्या प्रकाराविरूद्ध संशय व्यक्त केला आहे. मार्च महिन्यात जवळपास तीन वेळा महिलेला साप चावल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात सुरजने मित्राच्या मदतीने पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा साप चावल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नशीब बलवत्तर म्हणून ती या घटनेतून सुखरूप बचावली. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर ती सासरी न जाता तिच्या माहेरी गेली. 



त्यानंतर पत्नीच्या हत्ये कट रचून सुरज ६ मे रोजी सासरी पोहोचला. त्या रात्री त्याने कोब्रा जातीच्या सापांना पत्नीच्या अंगावर सोडले. तेव्हा सापांनी २ वेळा महिलेचा चावा घेतला. अखेर ७ मे रोजी सकाळी महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. 


दरम्यान लग्नात महिलेच्या वडिलांनी सुरजला सोने आणि पैसे दिली होते. तरी देखील तो पत्नीसोबत आनंदी नव्हता दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून तो सुखी संसार थाटण्याच्या विचात त्याने पहिल्या पत्निच्या हत्येचा कट रचल्याची  माहिती पोलिसांनी दिली आहे.