किळसवाणं! महिलेची हत्या करून नंतर मृतदेहासोबत संपुर्ण रात्रभर...
सहा दिवस पोलिसांसोबतचं फिरत होता आरोपी, अखेर असा झाला गजाआड
ग्वालियर : देशभरात बलात्काराच्या असंख्य घटना घडत असतात. या घटनेने देश दररोज हळहळ असतो. आता अशाच एका घटनेने संपुर्ण राज्य हादरलं आहे. या घटनेत आरोपीने जे पीडीतेसोबत केलं आहे ते एकूण अनेकांना धक्का बसला आहे. नेमकी ही घटना कशी घडलीय ती जाणून घेऊयात.
या घटनेत पोलिसांना अज्ञातस्थळी आठवड्यापुर्वीचं एका महिलेची बॉडी सापडली होती. पोलिस या बॉडीची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत होते. काही दिवसांनी पोलिसांना या महिलेची ओळख देखील पटली. ही महिला हत्येपुर्वी एका घरात मालिश करण्यासाठी गेली होती. पोलिसांनी या घराचा शोध लावत घटनास्थळाचा तपास केला. या तपासात त्यांना आरोपी फरार झाल्याचे कळाले होते. मात्र कसून तपासाअती त्यांनी आरोपीला गजाआड केले होते. 35 वर्षीय चंदन आदिवासी असे आरोपीचे नाव होते. या आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घटनाक्रम
पोलिसांना आरोपी चंदनने दिलेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबर रोजी एक महिला त्याच्या घरी मालिशसाठी आली होती. आरोपीच्या मुलीच्या कमरेत दुखत असल्याने या महिलेला बोलावण्यात आले होते. या महिलेला मालिश करताना पाहून चंदनच्या डोक्यात बलात्काराची कल्पना आली होती. त्यानुसार त्याने बलात्काराचा प्लान आखला होता.
महिलेची मालिश झाल्यानंतर पैसे देण्याच्या बहाण्याने तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. आरोपीच्या या वागण्याला महिला विरोध करत होती. मात्र आरोपी काही मानला नाही, त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. महिला त्याचं ऐकत नसल्याने पाहून त्याने तिच्यावर काठी व दगडाने वार करून तिला जखमी केले. यानंतर जखमी महिलेची साडी उतरवून त्याने तिचे हात, पाय आणि तोंड बांधून तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारानंतर तिची हत्या केली.
मृतदेहासोबत रात्र काढली
महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची त्याला विल्हेवाट लावायची होती. मात्र बाहेर गणेशोत्सवाचा माहोल होता, असंख्य लोक रस्त्यावर फिरत होती. पोलिसांचाही चौफेर पहारा होता. म्हणून त्याने मृतदेहाची विल्हेवाट न लावता घरीच ठेवला. आणि संपुर्ण रात्रभर तो महिलेच्या मृतदेहा शेजारीच बसला होता.
पहाटे ४ वाजता मृतदेहाची विल्हेवाट
दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता आरोपी चंदन महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बाहेर पडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने मृतदेह घरापासून दूर नेऊन टाकला होता. महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला होता. यात आश्चर्यजनक बाब म्हणजे पोलिस जेव्हा महिलेच्या मृत्यूचा तपास करत होते तेव्हा आरोपी देखील पोलिसांसोबतच होता.
तिसऱ्या पत्नीच्या घरी अटक
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत कसून तपास सुरु केला होता. डॉग स्कॉडला देखील पाचारण करण्यातं आलं होत. आरोपीला आपणं पोलिसांच्या ताब्यात येणार असल्याचे कळताच तो घराला टाळा ठोकून फरार झाला. आरोपी चंदन बडगाव स्थित आपल्या नेहमीच्या ठिकाणी गेला, जिथे तो नेहमी नशा करायचा. मात्र नशा करताना त्याच्यासोबत एक अपघात घडला. आणि त्याला स्थानिकांनी रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तो रूग्णालयातून तो त्याच्या सासरी गेला.
असा अटकेत आला
पोलिसांना चंदन वर संशय आला होता. यासाठी पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. या तपासात त्यांना चंदनने तीन लग्न केल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याच्या या तीन बायकांना फोन करून आऱोपी घरी आल्यास माहिती देण्याच्या सुचना दिल्या होत्या.आरोपी चंदन त्याच्या तिसऱ्या बायकोच्या घरी गेला. यावेळी बायकोने या संबंधित माहिती पोलिसांना दिली होती.यानंतर पोलिसांनी त्याला तिसऱ्या बायकोच्या घरून ताब्यात घेतले. पोलिसांनी यावेळी आरोपी चंदनकडून दगड, काठी आणि रक्ताने माखलेले कपडे ताब्यात घेतले.
ही संपुर्ण घटना मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये घडली आहे.या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय.