नवी दिल्लीः इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहेत. सोशल मीडिया या अभासी जगात वावरत असताना अनेक गुन्हेही घडत आहेत. पत्नीचे इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स अधिक असल्याच्या कारणाने पतीने तिची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, इन्स्टाग्राममुळं पत्नीचा निघृण हत्या केल्याची घटना घडल्यामुळं सगळेच हादरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याने त्याच्याच पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तर, आरोपीने पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर एसयुव्ही कारमध्ये आपल्या दोन मुलांच्या समोरच बायकोची निर्घुण हत्या केली आहे. पत्नीचे इतर पुरुषांसोबत अवैध संबंध असल्याचा संशय पतीला होता. तसंच, पत्नीचे इन्स्टाग्रामवर मोठ्या संख्येने फॉलोवर्स होतो, ज्यामुळं पतीला चिड येत होती. पत्नीसमोर कमीपणा येत होता. त्याचकारणावरुन त्याने पत्नीला संपवले आहे. 


एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय आरोपीहा ट्रॅव्हल एंजट म्हणून काम करतो. तर, त्याची पत्नी हाऊस वाइफ आहे. दोघांनाही एक 12 वर्षांचा मुलगी आणि तर एक पाच वर्षांचा मुलगा आहे. लखनौ येथील पारा परिसरात दोघे राहत होते. पोलिसांनी पतीला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या कबुली जबाबात आपणच तिचा खून केल्याचं उघड केलं आहे. पत्नीने आरोपीला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले होते. ज्यामुळं सतत दोघांमध्ये वाद होत होते. आपल्या गैरहजेरीत पत्नीचे फॉलोवर्स तिला भेटण्यासाठी घरी येत होते, असा तिला संशय होता. त्यामुळं यावरुन दोघांमध्ये सतत वाद होत होते. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सगळे कुटुंबीय रायबरेली इथे जाण्यासाठी निघाले होते. पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर असताना पतीने एका ठिकाणी कार थांबवली त्यानंतर एका गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर संतापाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. त्यावेळी दोन्ही मुलंही तिथेच होते. 


पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी काही वेळ तसाच मुलांसोबत गाडीत बसून राहिला होता. उत्तर प्रदेश एक्स्प्रेस वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या पेट्रोलिंग वाहनाला पाहिल्यानंतर त्यांनी मुलांसह कारमध्ये स्वतःला बंद करुन घेतलं. संशयास्पद आढळल्यानंतर स्थानिक पोलिसांना घटनास्थळी बोलवण्यात आलं. त्यानंतर आरोपीच्या 12 वर्षांच्या मुलीने जबाब दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.