Crime News In Marathi: घरात पत्नीसह तिच्या प्रियकराला बघितले अन् नवऱ्याचे डोकंच सटकले. (Husband And Wife) नवऱ्याने थंड डोक्याने पत्नीच्या प्रियकराच्या हत्येचा प्लान रचला. पतीने आधी प्रियकराला रात्रीच्या जेवणासाठी थांबवले, दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चाही रंगल्या, रात्री त्याला झोपण्यासाठीही घरीच थांबवले अन् सकाळी घरात एकाच थरार रंगला. या घटनेने दिल्ली पुन्हा एकदा हादरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न झालेल्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. महिलेच्या पतीने वेळोवेळी समज देऊनही त्याने तिच्यासोबत संबंध न तोडल्याने प्रियकराला जीव गमवावा लागला आहे. प्रेयसीच्या नवऱ्यानेच त्याची धारदार चाकूने हत्या केली आहे. महिलेच्या पतीने त्यांना वारंवार समजवायचा प्रयत्न केला मात्र दोघांनीही त्याचे ऐखले नाही. अखेर पतीने योग्य वेळ साधत प्रियकराला घरी येण्यास भाग पाडले, नंतर दोघांनी एकत्र जेवणही केले. घरी जाण्यासाठी निघाला असता त्याला घरातच झोपायला सांगितले व सकाळी होताच सगळे झोपेत असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केले. 


मोठी बातमी! दादर स्थानकात होणार मोठा बदल, प्रवाशांचा गोंधळ थांबणार


मिळालेल्या माहितीनुसार, पूजा आणि प्रदीप या दोघांची मैत्री झाली होती. दोघंही एकाच कंपनीत काम करत होते. हळू-हळू दोघांमधील मैत्री वाढत गेली व त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याचदरम्यान पूजाच्या पतीला दोघांच्या संबंधांबाबत कळलं. प्रदीप अनेकदा पुजाच्या घरीदेखील येत-जात असे. हीच गोष्ट तिच्या पतीला खटकली. त्याने दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांपैकी कोणीच त्याचं ऐकलं नाही. 


महिलेचा पती चरण सिंह यांने प्रदीपच्या हत्येचा कट रचला. गुरुवारी चरण सिंह यांने अचानक गावाला जाण्याचा प्लान बनवला आणि घरातून बाहेर पडला. त्याच्या प्लाननुसार तो अचानक घरी परतला तेव्हा घरात आधीपासून प्रदीप उपस्थित होता. चरण सिंहला पाहून प्रदीप तेथून पळून जाऊ लागला. मात्र, चरण सिंहने त्याला पकडले व त्याला गोड बोलण्यात फसवून आजची रात्र तिथेच राहण्यास भाग पाडले. दोघांनी एकत्र जेवणदेखील केले. सकाळी जेव्हा सगळे साखरझोपेत होते तेव्हा चरण सिंहने प्रदीपच्या पोटात चाकुने वार केला. हल्ला होताच प्रदीपने आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून पुजा धावत घटनास्थळी आली व तिने प्रदीपला वाचवण्याचा प्रय़त्न केला. 


मोफत थाळीचा मोह पडला ९० हजारांना; एका फेसबुक लिंकमुळं महिला अडकली सायबर चोरट्यांच्या जाळ्यात


चरण सिंहने केलेल्या हल्ल्यात प्रदीप सिंह गंभीर जखमी झाला होता. पुजाने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चरण सिंहला अटक केली आहे.