लग्न करायचं होतं, आई मुलगी शोधेना, संतापलेल्या लेकाने तिचाच जीव घेतला
Son Killed Mother News In Marathi: लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून नाराज झालेल्या मुलाने आईलाच संपवले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Crime News In Marathi: आई आणि मुलाचे नाते हे खूप सुंदर असते. मात्र याच नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. तेलंगणाच्या सिद्दीपेट जिल्ह्यात एक खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. एका 45 वर्षांच्या महिलेची तिच्याच मुलाने हत्या केली आहे. आई लग्नासाठी मुलगी शोधू शकली नाही, यामुळं नाराज असलेल्या मुलाने आईलाच संपवले आहे. गुरुवारी ही घटना समोर आली असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. (Son Killed Mother)
तेलंगणातील बांदा जिल्ह्यातील मेलाराम गावात बुधवारी मध्यरात्री मुलाने आईची हत्या केली आहे. ही महिला तिच्या मुलासोबत राहत होती. या प्रकरणात पोलिसांनी मुलासह आणखी एका नातेवाईकाला अटक केली आहे. महिलेच्या मुलीच्या आरोपांनंतर तक्रार दाखल करत पोलिसांनी तपासादरम्यान मुलाला व एका नातेवाईकाला ताब्यात घेतलं होतं. त्यांनी गुन्हादेखील कबुल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने आईच्या डोक्यात वीट घालून हत्या केली आहे. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून तिचा गळा चिरला आहे. पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी नंतर त्याने खोटी कहाणी रचली. चोरीच्या कारणाने हत्या झाल्याचा खोटा बनाव त्याने रचला होता. ईश्वर असं आरोपीचे नाव असून त्याचे वय अवघे 21 वर्ष आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ईश्वर हा दिव्यांग होता. त्याला लग्न करायचे होते. त्यामुळं लग्नासाठी नवरी शोधण्यासाठी त्यांने आईवर दबाव टाकला होता. दिव्यांग आणि बेरोजगार असल्याने त्याला लग्नासाठी मुली मिळत नव्हत्या. त्यामुळं त्याची चिडचिड होत होती. आई लग्नासाठी मुलगी शोधू शकत नाही यामुळं तो आईवर नाराज होता. त्यामुळं त्याने आईचीच हत्या करण्याचा कट रचला. आणखी एका साथीदाराच्या मदतीने त्यांने आईलाच निर्घृणपणे संपवले.
पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
एका क्षुल्लक कारणावरुन मुलानेच पोटच्या आईचा खुन केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर, कुटुंबीयांतील इतर सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी अवघ्या एक दिवसांत हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे.