Husband Wife Video: हल्ली अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यात जोडप्यांचे व्हिडीओही सुसाट व्हायरल होत असतात. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका व्हायरल व्हिडीओची. तुम्हाला पहिल्यांदा हा व्हिडीओ पाहून कदाचित असं वाटेल की एक माणूस आपल्या खांद्यावरून कुठली मुर्ती वैगेरे घेऊन जातो आहे की काय... परंतु नाही. ही चक्क त्याची हाडामासांची बायको आहे. जिला टोपलीत उचलून नवऱ्यानं आणलं आहे. सध्या हा व्हिडीओ इतका व्हायरल होतो आहे की काही विचारू नका. हा व्हिडीओ पाहून सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरात चर्चाही रंगलेली आहे. नेटकरी या व्हिडीओखाली तूफान कमेंट्स करताना दिसत आहेत. सध्या या व्हिडीओचीच सर्वत्र हवा असून या नवऱ्याचे सर्वच जणं हे कौतुकही करताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही बाहुबली हा चित्रपट पाहिलाच असेलच. त्यात शिवगामी देवी कशाप्रकारे लहानग्या बाहूबलीला चक्क टोपलीतून खांद्यावरून घेऊन जाते किंवा बाहुबली खुद्द खांद्यावरून शिवलिंग आणतो. त्याचप्रमाणे चक्क आपल्या बायकोला त्यानं खांद्यावरून टोपलीत बसवून उचलून आणले. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. काही नेटकरी असं म्हणाले आहेत की, त्याला खरंच मानलं, असं म्हणत त्याचे कौतुक केले आहे. तर एका युझरनं लिहिलंय की, ती गरोदर आहे का? दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, हे काय कष्ट नवऱ्यानं केले परंतु बायको अधिक दमल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे सध्या या व्हिडीओची जोरात चर्चा आहे. सध्या हा व्हिडीओ जोरात व्हायरल होतो आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : Kitchen Hacks: दीर्घकाळ अंडी ताजी ठेवण्यासाठी करा 'हे' सोप्पे उपाय


हा व्हिडीओ एका मंदिरातील आहे. हे मंदिर उंट टेकडीवर आहे आणि ही टेकडी चढण्यासाठी भरपूर पायऱ्या आहेत. पण आपल्या बायकोला त्रास होऊ नये म्हणून तो आपल्या बायकोला देवीच्या मुर्तीसमोर नेतो आणि प्रेमानं तिला टोपलीच्या बाहरे काढतो. @sameer_starboy या युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.