Viral Video : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असून तरुण असो वा तरुणीनी जोडीदाराची निवड करताना शंभर वेळा विचारत आहेत. एवढंच नाही तर पालकही लग्न म्हटलं तर ज्या घराशी संबंध जोडणार आहे, त्या घरातील लोकांबद्दल आणि त्या स्थळाबद्दल डोळ्यात अंजन घालून विचारपूस करतात. आज तरुण किंवा तरुणी जोडीदाराबद्दल त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे मनासारखा जोडीदार मिळेपर्यंत त्यांचं वय वाढतं. तरीदेखील भावी जोडीदार हा आपल्याशी एकनिष्ठ असावा आणि तो फक्त आपल्यावर प्रेम करावं हे प्रत्येक जोडीदाराला वाटतं. (man married 4 bride in the same mandap how to take care of all four together video got viral Trending) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नात असो किंवा नवरा बायकोचं इथे दोघात तिसरा व्यक्ती खपवून घेतला जात नाही. अशातच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका पठ्ठ्याने दोन नाही तीन नाही तब्बल चार तरुणींनी एकाच मंडपात लग्न केलं आहे. 


तुम्हाला विश्वास बसणार नाही पण व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ते दिसून येतं आहे. या लग्नाची गोष्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे. हा व्हिडीओ @musafir_vj या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. एकाच मंडपात चौघींसोबत तो तरुण अग्नीभोवती 7 फेरे घेतना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 61 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाला आहे. 


हेसुद्धा वाचा - Viral News : 6 बायका सांभाळणं सोपं नाही! रोज रात्री संकोच होतो पण 'हा' जुगाड करत तो ठेवतो सगळ्यांना खुश


हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले असून नेटकरी म्हणत आहेत की, इथे एक लग्न सांभाळणं कठीण आहे. तिथे या पठ्ठ्याने चक्क 4 तरुणींनी लग्न केलं. हे जगातील आठवं आश्चर्य असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. विशेष म्हणजे या चारही तरुणी अशा लग्नासाठी सहमत असल्याचं दिसतंय. 



या व्हिडीओमागील सत्य समोर आलेलं नसून ही घटना कुठलही आहे. या चार तरुणींनी एकाच तरुणाशी का लग्न केलं याबद्दल काही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.