Viral News : 6 बायका सांभाळणं सोपं नाही! रोज रात्री संकोच होतो पण 'हा' जुगाड करत तो ठेवतो सगळ्यांना खुश

Viral News : मॉडेल आणि प्रभावशाली आर्थर ओउर्सनला 6 बायका आहेत. त्या  6 बायकांना सांभाळणं सोपं नाही, हे सांगत असताना तो त्यांना खुश ठेवण्यासाठी काय जुगाड करतो हे सांगितलं आहे.   

Sep 12, 2023, 12:42 PM IST

Treding news : आपण अनेकांनी हे ऐकलं असेल अहो एक बायको सांभाळणंदेखील कठीण होतं. लोक एकापेक्षा दोन बायको कसे बुवा सांभाळतात. मॉडेल आणि प्रभावशाली आर्थर ओउर्सनला 6 बायका असून त्याच्या धाडसाचं कौतुक करायला हवं. 

1/8

आर्थर ओउर्सनने आपल्या 6 पत्नींसोबतचे आयुष्य सोशल मीडियावर शेअर केलंय. हा एकटा माणूस 6 बायकांना सांभाळतो. 

2/8

लग्न हे मौजमजेसाठी असतं असं आर्थरचं मत आहे. त्याला एक बायको नाही तर सहा बायका आवडतात. प्रत्येकीसाठी काहीही करायला तयार असतो. 

3/8

खरं तर त्याने अनेक लग्न केलं. काही बायकांनी त्याला घटस्फोट दिला, मात्र आज फक्त 6 बायका त्याच्यासोबत राहतात. 

4/8

त्याचा या सहा बायका एकाच छताखाली राहतात. त्याने या घराला लव्ह मॅन्शन असं नाव ठेवलं आहे. 

5/8

तो म्हणाला की, लोकांना वाटतं असेल त्याच्या घरात फक्त भांडणं होत असेल. पण तसं नाही त्याच्या या सहा बायकांसोबत तो अतिशय आरामात या घरात संसार करतो.   

6/8

सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे त्याने अंथरुणावर सर्वांसोबत एक दिनचर्या विकसित केली आहे. त्यानुसार कुठल्या बायकोसोबत कोणत्या दिवशी तो बेडरुममध्ये झोपणार हे लिहून ठेवलं आहे. 

7/8

तो म्हणतो की, लग्न टिकवण्यासाठी प्रणय आवश्यक आहे. पण लग्नाचा पाया हा त्यावर टिकत नाही. तो म्हणतो की, पत्नीशी मैत्रीपूर्ण नातं असायला हवं, तरच सर्व समस्या दूर होतात. 

8/8

सोशल मीडियावर आर्थरला अनेक लोक फॉलो करतात. त्याने असंही सांगितलं आहे की, जोडीदारांना लग्नासाठी कसं पटवायचं याबद्दल त्याला यूजर्स टिप्स मागतात.