Crime News: 20 वर्षीय तरुणाचा शेतात मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यापासून ते तपास करण्यापर्यंत पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. जितेंद्र कुमार असं या तरुणाचे नाव असून 15 ऑक्टोबर रोजी त्याचा मृतेदह शेतात आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी 19 वर्षीय अजय सिंह याला अटक करण्यात आहे. जितेंद्र आणि अजित यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातूनच झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे ही घटना घडली आहे. अजय सिंह आणि जितेंद्र कुमार दोन वर्षांपासून हरियाणातील एका कारखान्यात काम करत होते. तेव्हाच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, काही दिवसांनी जितेंद्रचे त्याच्याच गावातील एका मुलीसोबत लग्न ठरले. दोघांचा साखरपुडादेखील झाला होता. ही गोष्ट अजयला कळल्यानंतर त्याने हे लग्न मोडण्यास सांगितले होते. 


मात्र, जितेंद्रने या उलट अजयलाच त्याच्यासोबत असेलेल संबंध तोडण्यास सांगितले. जितेंद्रच्या या वागण्यामुळं संतापलेल्या अजयने जितेंद्रची हत्या करण्याचा कट रचला. रविवारी तो जितेंद्रला घेऊन जवळच्याच शेतात घेऊन गेला आणि तिथे गळा घोटून त्याचा जीव घेतला. त्यानंतर पोलिसांना उसाच्या शेतात जितेंद्रचा मृतदेह आढळला होता. 


हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तैनात केली होती. खबरी आणि चौकशीतून अजयचे नाव समोर आले. अजय हरियाणाला पळून जात असताना पोलिसांनी त्याचा अटक केली. अजयने दिलेल्या जबाबात, त्याने म्हटले आहे की, तो जितेंद्रला हरियाणाला घेऊन जायला आला होता. मात्र, त्याच्या साखरपुडा झाल्यानंतर सगळं उद्ध्वस्त झालं.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला हरियाणामध्ये जितेंद्रची हत्या करायची नव्हती. कारण त्यानंतर त्याला त्याच्यावर संशय आला असता याची भीती होती. त्यामुळं त्याने हत्या करण्यासाठी त्याचे गाव निवडले. पोलिसांना घटनास्थळी एक दोरखंड सापडला होता. पोलिसांनी या सगळ्या वस्तू ताब्यात घेऊन त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. पोलिसांनी जितेंद्रचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. आरोपींला पोलिसांनी अटक केली आहे.